देशातल्या ५३९ खासदारांमध्ये ‘हा’ मराठमोळा खासदार ठरला कामात एक नंबर

0

 

 

संसदीय पार्लिमेंटरीमध्ये बिझनेस पोर्टल १ च्या माध्यमातून देशातील ५३९ खासदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा नुकताच जाहीर केला आहे. या ५३९ खासदारांच्या यादीत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी अव्वल ठरले आहे.

देशातल्या सर्व खासदारांनी केलेल्या सगळ्या कामगिऱ्यांचे वर्गीकरण यावेळी करण्यात आले होते. गोपाळ शेट्टी यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होती, तर २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा पराभव केला होता.

गोपाळ शेट्टी यांना ५ पैकी ४.९ गुण मिळाले आहे. संसदेतील हजेरी, खासदार खाजगी विधेयक आणि खासदारांच्या वैयक्तिक कामगिरी या तिन्ही कामात शेट्टी पहिले आले आहे. तर संसदेत शेट्टी यांचा ५३९ खासदारांमध्ये ४ था क्रमांक आला आहे.

गोपाळ शेट्टी देशातील पहिल्या क्रमांकाचे खासदार ठरल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे सोमवारी बोरिवली पश्चिम लोकमान्य नगर येथील कार्यालयात त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

गोपाळ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ठ खासदार म्हणून कागिरीची नोंद झाल्याबद्दलचे रहस्य विचारले असता, त्यांनी नागरिकांशी सतत संपर्क असलेला जनसंपर्क, वक्तशीरपणा, जिथे अपेक्षित असेल तिथे उपस्थिती.

तसेच जर प्रशासनाकडून सनदशीर मार्गाने नागरिकांचे प्रश्न सुटत नसतील तर थेट रस्त्यावर उतरुन त्यांचे प्रश्न सोडविणे. अशा प्रकारची कार्यपद्धती असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.