केरोली टाकक्स: पिस्तुल शुटींगचा एकलव्य

0

 

 

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याच्या नशीबाने तर त्याला हरवण्याचे ठरवले होते, पण त्याने कधीच हार मानली नाही आणि एक हात असतानाही इतिहास रचला.

आपल्या नशीबला हरवणाऱ्या या माणसाचे नाव केरोली टाकक्स असे आहे. करोलीला पिस्तुल शुटींगचा एकलव्य म्हटले जाते. केरोलीचा जन्म २१ जानेवारी १९१० मध्ये झाला होता. तो हंगेरीचा रहिवासी होता.

केरोलीला लहानपणापासूनच आर्मीत जायचे होते. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन हंगेरीची आर्मी जॉईन केली. आर्मी असताना ते पिस्तुल शुटींगमध्ये माहिर झाले. ते शुटींगमध्ये इतके परफेक्ट झाले होते, की नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर गोल्ड मेडल जिंकले होते.

तेव्हा हंगेरीच्या लोकांना विश्वास झाला होता की १९४० मध्ये टोक्योमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत हंगेरीला गॉल्ड मेडल केरोलीच जिंकवून देईल. केरोली सुद्धा देशाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तयारी सुरु केली होती, पण त्याच्या नशीबाला ते मान्य नव्हते.

अशात आर्मीच्या एका ट्रेनिंगमध्ये त्यांच्या हातात ग्रेनेट फुटले. या घटनेत केरोली यांना त्यांचा हात गमवावा लागला. या घटनेमुळे पुर्ण हंगेरी देशालाच धक्का बसला होता, पण एक माणूस अजूनही होता, ज्याला जरासाही धक्का नव्हता बसला, तो म्हणजे स्वत: केरोली टाकक्स.

उजवा हात जरी गमावला असला, तरी त्याला त्याच्या डाव्या हातावर विश्वास होता. त्याने याच हाताने शुटींग करण्यास सुरुवात केली. त्याने डाव्या हाताने शुटींग करण्यास सराव सुरु केला. कारण त्याला देशाला गोल्ड मेडल मिळवून द्यायचे होते.

डाव्या हाताने शुटींग करण्यास त्याला खुप अडचणी आल्या पण त्याने हार मानली नाही. त्याच्या एका हातावर ताण आल्याने त्याला बऱ्याचदा त्रास व्हायचा पण त्याने आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि अखेर स्वत:ला डाव्या हाताच्या शुटरमध्ये तयार केले.

सुरुवातीला त्याने १९३९ च्या एका ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला, पण तेव्हा लोकांना माहित नव्हते की केरोली आता डाव्या हाताने शुटींग करतात. तिथल्या स्पर्धकांना वाटले केरोली फक्त स्पर्धा बघण्यासाठी आलेत, पण ते तेव्हा हैराण झाले जेव्हा केरोली म्हणाले की, मी शुटींग करण्यासाठी आलो आहे.

केरोली टाकक्स यांनी डाव्या हाताने पिस्तुल शुटींग करुन सर्व स्पर्धकांना हरवले आणि पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत ते हिरो बनले. आता लोकांना आतुरता होती, ती १९४० च्या ऑलिंपिकची.

पण झाले असे की दुसऱ्या विश्व युद्धामुळे १९४० ची ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे हंगेरीची जनता निराश झाली होती, पण केरोलीची हिम्मत अजूनही तुटलेली नव्हती. त्यानंतर केरोली १९४४ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांच्या तयारी लागले. पण पुन्हा एकदा विश्व युद्धामुळे ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्यात आली.
पुढची ऑलिंपिक स्पर्धा १९४८ मध्ये झाली, तोपर्यंत केरोली यांनी ऑलिंपिकची पुर्ण तयारी केली होती. तेव्हाया स्पर्धेत त्याने सर्व स्पर्धकांना हरवले आणि गोल्ड मेडल जिंकले.

१९५२ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये केरोलीने पुन्हा हंगेरी देशाकडून पिस्तुल शुटींग स्पर्धेत भाग घेतला. त्या स्पर्धेतही त्याने इतिहास रचत हंगेरीला गोल्ड मेडल जिंकून दिले.

केरोली टाकक्सची गोष्ट आपल्याला प्रेरणा देणारी आहे. कारण आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण त्यापासून लांब पळालो नाही पाहिजे त्याचा सामना केला पाहिजे, तेव्हाच आपल्याचा त्या संकटांवर मात करता येते.

Leave A Reply

Your email address will not be published.