वडिलांचा झाला मृत्यु पण खचून न जाता सुरु केली मशरुमची शेती, आता करतेय लाखोंची कमाई

0

 

आजकाल तरुण तरुणी नोकरी करण्यापेक्षा शेतीमध्ये भविष्य बनवण्यासाठी काही प्रयत्न करत असतात, तर काही तरुण- तरुणी नोकरी सोडून शेती करताना दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा तरुणीची गोष्ट सांगणार आहोत जी फक्त २६ वर्षांची असून शेतीत लाखो रुपयांची कमाई करत आहे.

उत्तराखंडच्या टिहेरी जिल्ह्याच्या नागणी गावात राहणाऱ्या या मुलीचे नाव मोनिका आहे. मोनिकाने बीटेकचे शिक्षण घेतले पण नोकरी केली, पण नंतर तिने शेती करण्याला प्राधान्य दिले आणि तिने मशरुमची शेती सुरु केली. आता ती मशरुमची शेती करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे.

मोनिकाने २०१७ मध्ये शेती करण्यास सुरुवात केली होती. ती रोज २५० किलोग्रॅम मशरुमचे उत्पादन घेत आहे. जे कि १२० रुपये किलोग्रॅमने विकले जात आहे. विशेष म्हणजे सर्व खर्च जाऊन ती या शेतीतून लाखोंची कमाई करत आहे. तसेच ही शेती करत असताना तिने अनेक लोकांना रोजगारही दिले आहे.

मोनिका जेव्हा नोकरी करत होती, तेव्हा ती नोकरी करण्यात तिचे मन लागत नव्हते. त्यामुळे तिने नोकरी सोडली आणि मोनिका गावाला परतली. तिथूनच तिने शेती करण्यास सुरुवात केली.

जेव्हा तिने शेती करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा तिला लोक गांभीर्याने घेत नव्हते, कारण तिचे वय तेव्हा खुप कमी होते. पण तिला स्वत:वर विश्वास होता. त्यामुळे तिने आपले काम सुरुच ठेवले आणि तिचे काम बघून लोकांनाही तिचा विश्वास बसला आणि त्यानंतर तिला ऑर्डर मिळायला लागल्या.

मोनिकाने शिटाके मशरुमच्या शेतीसोबतच तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मशरुमची तिने लागवड केली आहे. मोनिकाने सुरुवातीला कमी गुंतवणूकीनेच सुरुवात केली होती.

मशरुमच्या पाच टन उत्पादनामध्ये दीड ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते, पण तुम्हाला जर कमी गुंतवणूकीत शेती करायची असेल तर तुम्ही पाच हजारांच्या गुंतवणूकीत महिन्याला ३० हजार रुपयांची कमाई करु शकतात.

२०१४ मध्ये मोनिकाच्या वडिलांचा मृत्यु झाला होता, तिच्या वडिलांची ज्वेलरी शॉप होती. अशा स्थितीत तिच्या आईने तो व्यवसाय सांभाळला. असे असताना मोनिकाला ज्वेलरीचा व्यवसाय सांभाळण्याची संधी होती, पण तिने शेतीला निवडले. आता मोनिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.