विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या या धडाकेबाज बॉलरची लागली लॉटरी, धोनीने मोजले तब्बल ७ करोड

0

 

लवकरच आता क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण आता इंडीयन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलचा १४ सिजनच्या लिलावाचा पहिला टप्पा पार पडला आहे. या लिलावात क्रिकेट प्रेमींना अनेक आश्चर्याचे धक्के बसले आहे.

प्रसिद्ध खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंगमध्ये चांगलीच झडप झाली होती, पण अखेर आरसीबीने १४.२५ कोटी देऊन त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.

चेन्नईने त्यानंतर ख्रिस मॉरिस यासाठी प्रयत्नशील होते पण खिशात १९.९ कोटी रुपये असल्याने त्यांना तिथेही माघार घ्यावी लागली. पण चेन्नईला त्यांच्या संघात एक परदेशी खेळाडू घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी ही संधी मोईन अलीला दिली आहे.

चेन्नईने मोईन अलीला ७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. मोईन अली इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. इंग्लंड-भारत यांच्यातल्या चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या इतकेच नाही तर त्याने १० बॉलमध्ये ६ सिक्स मारले होते.

या सामन्यात त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवला होता, तेव्हापासून अली चेन्नईच्या संघात खेळणार अशी चर्चा रंगली होती आणि अखेर चेन्नईनेच त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.

मोईन अलीने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये १८ बॉलात ४३ रन बनवले होते. त्याने सलग तीन सिक्स मारले होते. मोईन अलीची बेस्ट प्राईज २ कोटी इतका होता. आता मात्र चेन्नईने मोईन अलीला ७ कोटींना खरेदी करुन मालामाल करुन टाकले आहे.

मोईन अली ३३ वर्षांचा आहे. त्याला सर्वात आधी आरसीबीने रिलिज केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएचे १९ सामने खेळले आहे. त्यात ३०९ रन बनवले आहे, तर गोलंदाजी करत त्याने १० विकेट घेतल्या होत्या.

सध्या चेन्नईच्या टिममध्ये एमएस धोनी, सुरेश रैना, केएम असिफ, इमरान ताहीर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रविंद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड, जोश हेजलवूड, अंबाती रायडू, दिपक चाहर, फाफ डू प्लेसिस, शार्दुल ठाकुर, ड्वेन ब्रावो, सॅम कुरेन हे रिटेन खेळाडू आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.