याला म्हणत्यात मनसे! पुण्यात मनसे नगरसेवकाने हॉटेलच्या हॉलमध्ये उभारले कोव्हिड हॉस्पीटल

0

पुणे | राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपचाराअभावी कोरोना रूग्णांचा मृत्यू होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कडक निर्बंधाची अंमलबजावणी करत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊचे पालन करण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यात कोरोनाने रौद रूप धारण केले आहे. पुण्यात ऑक्सिजन बेड, लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच पुणेकरांच्या मदतीला मनसे नेते नगरसेवक वसंत मोरे धावून आले आहेत.

वसंत मोरेंनी पुण्यात एका हॉटेलच्या हॉलमध्ये फक्त ५ दिवसांमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पीटल सुरू केले आहे. यामुळे पुणेकरांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. सोशल मिडियावर वसंत मोरेंच्या कार्याचे कौतूक होताना दिसून येत आहे.

नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, “५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पीटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पीटल चालू करू शकतो तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात १६८० बेड तयार झाले असते आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो. अजूनही वेळ गेलेली नाही.”

कोण आहेत वसंत मोरे

वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज परिसरातील नगरसेवक आहेत. मनसेचे आक्रमक नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. राज ठाकरेंसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर मनसे पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबबदारी सोपवण्यात आली आहे.

कोरोना काळात त्यांनी अनेक गोरगरीबांची मदत केली होती. पुण्यातील मनसेच्या आंदोलनात ते नेहमी सहभागी असतात. गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोना रुग्णांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याने त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.