‘या’ आमदाराच्या पायावर कार्यकर्ता डोकं ठेवतो आणि म्हणतो ‘आबा तुम्हीच निवडणूक लढा’

0

 

राजकारणात सत्तरी पार केल्यानंतर अनेक जण ब्रेक घेतात, पण शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांचं जरा वेगळंच आहे. वयाच्या ९४ वर्षी पण या माणसाचा राजकारणातील दबदबा तेवढाच आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल ११ वेळा एकाच पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवून आणि त्या जिंकून गणपतराव देशमुखांनी इतिहास घडवला आहे. सांगोला मतदार संघातून तब्बल ११ वेळेस ते आमदार झाले आहे.

१९६२ साली गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक लढली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटाने सुरू केलेला आपला राजकिय प्रवास त्यांनी आपल्या शेवटच्या निवडणूकीपर्यंत कायम ठेवला.

अत्यंत साधे राहणीमान असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. १९६२ साली त्यांनी पहिली निवडणूक जिंकली होती. २०१२ मध्ये विधानसभेतील आमदार म्हणून त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाली होती.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी विधानसभा निवडणुकीत १० वेळा विजयी होऊ आमदार झाले होते. २००९ च्या निवडणूकीत विजय मिळवून गणपतराव देशमुख १० वेळा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशातील दुसरे आमदार झाले होते.

देशमुखांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवला. त्यामुळे सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम त्यांनी स्वतःच्या नावे केला. २०१९ मध्ये पण ते निवडणूक लढणार होते पण त्यांनी माघार घेतली.

विधानसभा निवडणुकीत मी जर उभा राहिलो तर आमदार म्हणून नक्की निवडून येईल पण माघारी शेतकरी कामगार पक्षाचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे, असे म्हणत गणपतरावांनी गेल्यावर्षीच्या विधानसभेच्या निवडणूकीतून माघार घेतली होती.

गणपतराव देशमुखांनी घेतलेल्या या माघारीनंतर कारकर्यांच्या आणि सांगोल्याच्या जनतेचे अश्रू अनावर आले होते, ज्या ठिकाणी देशमुखांनी हे जाहीर केले त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

अनेक शेकापच्या कार्यकर्त्यांनी तर गणपतरावांच्या पायावर डोकं ठेवलं होतं, आणि आबा यंदाची निवडणूक पण तुम्हीच लढा असे म्हणाले होते. आपल्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे एवढे प्रेम पाहून गणपतराव पण गहिवरले होते.

आज कालच्या राजकीय नेते कधी या पक्षात दिसतात तर कधी या पक्षात पण ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं, त्याच पक्षात शेवटपर्यंत निवडणूक लढणारे गणपतराव देशमुख हे एकमेवच नेते आहे.

गणपतराव देशमुख ना कधी लोभाला बळी पडताना दिसले ना कधी मंत्री पदाला. केवळ आपल्या जनतेसाठी निस्वार्थपणे काम करणे हे एकच ध्येय त्यांचे होते. आपल्या पक्षांचे नाव टिकून राहिले पाहिजे, यासाठी एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणे हे फक्त गणपतरावच करू शकतात. आजच्या राजकारणात गणपतराव देशमुखांसारखा नेता होणे जरा कठीणच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.