जिद्दीला सलाम! स्पर्धेच्या पूर्वी वडिलांचा झाला मृत्यू पण हार न मानता तिनेही ऍथलेटिक्स स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

0

 

जीवनात मुलं मुली मेहनत घेऊन आपले ध्येय गाठतात. त्यात मुलांच्या आई-वडिलांचेही मोठे योगदान असते. अशात मुलं आपले ध्येय गाठण्यासाठी निघाले आणि आपल्या पालकांची साथ सुटली तर ध्येय गाठणे आणखी कठीण होते.

आजची ही गोष्ट अशाच एका मुलीची आहे, जी स्पर्धेला जाण्यापूर्वीच अचानक तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तरीही खचून न जाता या मुलीने स्टेट ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. या मुलीचे नाव मिताली दीपक भोयर असे आहे.

मितालीचे वडील म्हणजेच दीपक भोयर हे ऑटोरिक्षा चालक होते, २९ नोव्हेंबर २०२० ला त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. तरीही मितालीने आपल्या सरावात खंड पडू दिला नाही. मितालीने केवळ दोन महिन्याच्या आत राज्य ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींच्या १५०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले आहे.

तसेच तिने हे पदक जिंकून तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेली पात्रताही सिद्ध केली आहे. ही राज्य स्पर्धा सध्या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल पुणे येथे सुरू आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मितालीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्यासह तिच्या पूर्ण कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला होता. अशावेळी तिला खचू न देता कुटुंबियांसोबतच प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या इतर सदस्यांनी तिला मानसिक आधार दिला.

मिताली नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाची खेळाडू आणि पंडित बच्छराज व्यास ज्युनियर महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिने ही १५०० मीटरची शर्यत ५ मिनिटे ०.४ सेकंदात पूर्ण केली आहे. त्यामुळे तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेली ५ मिनिटे ११ सेकंदाची पात्रता सहज पार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.