अभिमानास्पद! पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधवने पटकावला मिस इंडियाचा खिताब

0

राजस्थान येथील जयपूर येथे नुकतीच ग्लमोन मिस इंडिया स्पर्धा पार पडली. तुम्हाला वाचून आश्चर्यही वाटेल आणि अभिमानही वाटेल की जालना शहरातील दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी या मिस इंडिया स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

या त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि पोलीस दलाची मान आणखीनच उंचावली आहे. पोलीस उपनिरीक्षक पद इतके मोठे पद सांभाळत असताना स्वतःला आवडणारा छंद जोपासणे काही सोपी गोष्ट नाही.

पल्लवी जाधव यांनी हेच काम करून दाखवले आहे. पोलीस दलातील काम, आपली जबाबदारी पार पाडत त्यांनी त्यासोबत छंदही जोपासला आहे. जयपूर येथे नुकतेच ग्लमोन मिस इंडिया ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आणि प्रथम क्रमांक मिळवला आहे. पूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास जर तुम्ही वाचला तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

त्यांनी खूप हलाखीचे दिवस सोसले आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामात कामावर खड्डे खोदणाऱ्या किंवा हातात कोयता धरून ऊस तोडणाऱ्या असे मिळेल ते काम करणाऱ्या कुटुंबाने त्यांना कठीण परिस्थितीत शिक्षण दिले. २० मे २०१५ रोजी त्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.

पल्लवी जाधव या मानसशास्त्र या विषयात देखील पारंगत आहेत. अशा सुंदरतेला आमचा सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पल्लवी जाधव यांना शुभेच्छा.. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.