ठाण्याची ‘ही’ मराठमोळी मुलगी ठरली ऑस्ट्रेलियाची मिस इंडिया; वाचा तिची कहाणी

0

 

 

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मराठी माणूस महाराष्ट्राचे नाव मोठे करताना दिसून येत आहे. अशात आता महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानास्पद बाब समोर आली आहे.

ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर संदीप माने यांची मुलगी श्रुतिका माने हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय तरुणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिस इंडियाच्या अंतिम फेरीत ७ स्पर्धकांची निवड झाली होती. त्यानंतर त्यांची ऑनलाइन मुलाखत आणि ऑडिशन घेण्यात आले होते. या स्पर्धेत श्रुतिकाचा पहिला क्रमांक आला आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या राज सूरी यांनी सौंदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकांना मार्गदर्शन केले होते.

श्रुतिकाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. त्यानंतर तिने ठाण्यात आल्यावर सिंघनिया स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले होते. ती सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ मेडिकल सायन्स या पदवीचे शिक्षण घेत आहे.

श्रुतिकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच तिने अनेक वक्तृत्व स्पर्धेत संपादनदेखील केले आहे. श्रुतिकाला अभिनयाची आवड असून ती अभिनय देखील करत असते.

मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, माझ्यासाठी मिस इंडियाचा हा मुकुट खूप मोठी जबाबदारी आहे त्याची मला जाणीव देखील आहे, असे श्रुतिकाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.