२१ व्या वर्षी राजकारणात, वाचा विलासरावांचे वारसदार आणि राज्यमंत्री अमित देशमुखांबद्दल..

0

आज आम्ही तुम्हाला विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुखांबद्दल काही माहिती सांगणार आहोत. अमित देशमुख यांचा जन्म २१ मार्च १९७६ रोजी झाला होता. त्यांनी बीई केमिकलची पदवी घेतली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला होता.

त्यांनी १९९७ मध्ये लातूर महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात भाग घेतला होता. त्याच वर्षी त्यांनी युवक काँग्रेसमधून कार्यास सुरूवात केली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना राजकारणात येण्यासाठी फारसा काही संघर्ष करावा लागला नाही.

सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचे वडील विलासराव देशमुख हे राज्याचे दोनदा मुख्यमंत्री होते. राज्य आणि देशाच्या राजकारणात त्यांचे खुप मोठे वर्चस्व होते. त्यामुळे अमित देशमुख यांना आपोआपच प्रसिद्धी मिळणे साहजीकच होते. त्यांना फारसा काही संघर्ष करावा लागला नाही.

मतदारांनीही त्यांना चांगलाच पाठिंबा दिला. त्यांना आपोआपच मानसन्मान आणि काँग्रेसमध्येही वरचे स्थान मिळाले होते. अमित देशमुखांकडे सध्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांची ओळख विलासरावांचे पुत्र म्हणून आहे.

अलिकडेच त्यांच्यावर आरोप झाला होता की त्यांचे बंधू धीरज याच्यासाठी त्यांनी लातूर ग्रामीणची सीट फिक्स केली आहे असे भाजप नेते संभाजी पाटील यांनी आरोप केला होता. त्यावेळी अमित देशमुख चर्चेत आले होते. विलासरावांनंतर लातूरचे आमदार म्हणून अमित देशमुखच प्रतिनिधीत्व करत आहेत.

काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतले नेते म्हणून त्यांचे स्थान आहे. राहुल गांधींच्या गटातले नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. अमित देशमुख यांच्यामध्ये सर्व वडिलांचे गुण आहेत. विलासरांवासारखे दिसणे, त्यांच्यासारखाच आवाज, त्यांच्यासारखीच कार्यशैली आणि अभ्यासुपणा यामुळे त्यांनी आपल्या पक्षात प्रभाव पाडला.

त्यांना युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदही मिळाले. २००२ ते २००८ पर्यंत त्यांनी युवक काँग्रेसचं उपाध्यक्षपद सांभाळले होते. त्यांनी तीन वेळा निवडणूकीत विजय मिळवला आहे. त्यांनी २००९ मध्ये ९ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये ४९ हजार मतांनी विजय मिळवला होता.

त्यानंतर त्यांनी २०१९ च्या निवडणूकीत ४० हजार मतांनी विजय मिळवला होता. पण त्यांचे मताधिक्य हळू हळू कमी होताना दिसत आहे. २०१९ ची निवडणूक त्यांच्यासाठी खुप महत्वाची होती. २०१४ ला विलासरावांच्या निधनामुळे त्यांना सहानुभूती मिळाली.

परंतु २०१९ ची निवडणूक त्यांच्यासाठी एक परिक्षा होती. त्यातच त्यांचे भाऊ धीरज देशमुखही निवडणूकीला उभे होते. त्यामुळे त्यांनी भावाचाही प्रचार केला होता. त्यातच त्यांना अभिनेते रितेश देशमुख यांचीही महत्वाची साथ मिळाली होती त्यामुळे त्यांनी या निवडणूकीत विजय मिळवला.

विलासरावांचे निधन झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये अमित देशमुख यांची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मंत्रिपद देण्यात आले होते

. त्यांना अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि पर्यटन खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे सरकार आल्याने काँग्रेसला पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून कामगिरी पार पाडावी लागली.

त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आले. अशी होती त्यांची राजकीय कारकीर्द. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.