जगाचा निरोप घेतला तरी हा सेलिब्रिटी वर्षाला कमावतो ४६ कोटी, फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानी

0

प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आजचे सेलिब्रिटी दरवर्षी कोट्यावधी रुपये कमावतात. भारतातील अनेक सेलिब्रिटी जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत आहेत. त्यांच्या कमाईचा आकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल.

पण आम्ही जर असे म्हणालो की असा एक सेलिब्रिटी आहे जो मृत्युनंतरही बक्कळ पैसा कमवत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मृत्युनंतरही काही सेलिब्रिटींची लोकप्रियता कमी झालेली नाही.

अशीच एक बाब समोर आली आहे. काही दिवसांपुर्वी कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या सेलिब्रिटींची यादी फोर्ब्सने जाहीर केली होती. त्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचा समावेश होता. या यादीत पॉप स्टार आणि डान्सर मायकल जॅक्सन पहिल्या क्रमांकावर होता.

किंग ऑफ पॉप ओळखला जाणारा मायकल जॅकसन आजही खुप लोकप्रिय आहे हे यावरून स्पष्ट होते. २००९ मध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मायकलचा मृत्यु झाला होता पण तरीही तो आजही कोट्यावधींची कमाई करत आहे.

मायकल दरवर्षी ४८ कोटींची कमाई करतो. आजही त्याच्या म्युझिक कंपनीत त्याची भागिदारी आहे. त्याच्या संगीताची रॉयल्टी किती वेगळी आहे हे सर्वांनाच माहित आहे. तीन वर्षांपुर्वी त्याची कमाई साडेचारशे करोड रूपये इतकी होती. या टॉप टेनच्या यादीत अल्बर्ट आइन्स्टाईनचेही नाव होते.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ते अजूनही दरवर्षी ६ कोटी रूपयांची कमाई करतात. ६२ वर्षांपुर्वी अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे निधन झाले होते. विज्ञानाच्या अनेक फॉर्मुल्यांचे परवाने आज त्यांच्या नावावर आहेत ज्याद्वारे त्यांना आजही त्यांची रॉयल्टी मिळते.

मायकल जॅकसन आणि आइन्स्टाईन यांच्याशिवाय फोर्ब्सच्या टॉप टेनच्या यादीत बॉब मार्ले, जॉन लेनन, आर्नोल्ड पामर आणि चार्ल्स शुल्ज यांच्या नावांचाही समावेश आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.