कोल्हापुरकरांचा नादच नाय! पठ्ठ्याने अमेरिकेत वाजवला कोल्हापूरचा डंका

0

अशी एक म्हण आहे की जगात भारी आम्ही कोल्हापुरी पण ही म्हण खरी आहे असे तुम्हाला आज वाटेल. कारण न्यु जर्सीत आता कोल्हापुरकरांचा डंका वाजू लागला आहे. कोल्हापुरात मोटारीच्या नंबरप्लेटवरून नेत्यांच्या, उद्योगपतींच्या गाड्या ओळखल्या जातात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच कोटी महसूल फक्त अशा वाहनांच्या क्रमांकातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळतो. पुर्ण महाराष्ट्रात MH 09 ची क्रेझ आहे. पुण्यातही बऱ्याच ठिकाणी या नावाने हॉटेल्स आहेत.

आता हाच प्रवास अमेरिकेत जाऊन पोहोचला आहे. कारण शंतनु शिंदे यांनी त्यांच्या गाडीला चक्क MH 09 KOP हा क्रमांक मिळवला आहे. शंतनु मुळचे कागलचे आहेत पण ते सध्या न्यु जर्सीमध्ये राहतात. त्यामुळे कोल्हापुरातली क्रेझ आता थेट अमेरिकेत पाहायला मिळाली आहे.

शिंदे यांनी या नंबरप्लेटसाठी ४५ डॉलर मोजले आहेत. अमेरिकेत सात डिजीटचा कोणताही क्रमांक तुम्ही घेऊ शकता. त्यांचा आधीचा गाडी नंबर SHINDE असा होता. मात्र त्यांनी नुकतीच नवीन गाडी आणली होती त्या गाडीसाठी त्यांना नंबरप्लेट हवी होती.

मग त्यांनी आपल्या गाडीला थेट MH 09 KOP ही नंबरप्लेट बसवली आणि त्यांनी या क्रमाकांच्या माध्यमातून कोल्हापूर कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हापण एखाद्या कार्यक्रमात ते गाडी घेऊन जातात तेव्हा लोक त्यांच्या गाडीची नंबर प्लेट पाहून आश्चर्यचकित होतात आणि त्यांच्या गाडीसोबत सेल्फी घेतात.

अमेरिकेत राहून त्यांना आज १० वर्षे झाली पण ते आपल्या कोल्हापूरच्या संस्कृतीला आजिबात विसरले नाहीत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खुप आदर आहे. ते गणेशभक्त आहेत. त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डवर गणपती आणि शिवाजी महाराजांची एक छोटीशी मुर्ती ठेवली आहे.

ते रोज या मुर्त्यांची पुजा करतात. नुकतेच ते कोल्हापूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी आपल्या गाडीच्या मागच्या काचेवर चिकटवण्यासाठी शिवाजी महाराजांचे रेडियमचे चित्र सोबत घेऊन गेले होते.

याआधी त्यांच्या गाडीवर जय महाराष्ट्र असे लिहिले होते. सध्या अमेरिकेत खुप मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. ऊन आल्यानंतर ते मोटारीच्या काचेवर शिवाजी महाराजांचे चित्र चिकटवणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.