व्हॉट्सअ‌ॅपद्वारे व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवा लाखो रुपये; पुण्याच्या मेघाची अनोखी आयडिया

0

 

 

सध्या व्हॉट्सअ‌ॅप माणसाच्या जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे. अनेक लोक व्हॉट्सअ‌ॅपचा गैरवापर करताना आपल्याला दिसून येतात. पण व्हॉट्सअ‌ॅपचे फायदेसुद्धा खुप आहेत, अनेकांसाठी व्यवसायाची संधी व्हॉट्सअ‌ॅपने उपलब्ध करुन दिली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत जिने आपला पुर्ण व्यवसाय व्हॉट्सअ‌ॅपवर उभा केला आहे.

पुण्याच्या मेघा बाफनाने आपली कला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्हॉट्सअ‌ॅपची मदत घेतली आणि तिथूनच तिने एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांना या व्यवसायात इतके यश मिळाले आहे की या व्यवसायातून मेघा लाखोंची कमाई करत आहे.

मेघा कोशिंबीर बनवण्याचा व्यवसाय करते. तिला खुप आधीपासून कोशिंबीर बनवण्याची आवड होती. ती वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर बनवते. ती आधी फक्त हे घरी बनवायची पण त्यानंतर तिने आपल्याला आवडीला व्यवसायाचे स्वरुप दिले.

सुरुवातीला तिने कोशिंबीर बनवून त्याबाबत आपल्या व्हॉट्सअ‌ॅपच्या लेडीज ग्रुपमध्ये मार्केटींग सुरु केली. तिथूनच तिला दोन तील ऑर्डर मिळाल्या, त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढला, हळुहळु तिने आपली व्हॉट्सअ‌ॅपची मार्केटींग वाढवण्यास सुरुवात केली.

तिने तयार केलेली कोशिंबीर लोकांना प्रचंड आवडल्याने लोकांनकडून तिला चांगलाच प्रतिसाद मिळाला. तिने तेव्हाच व्यवसायाला सुरुवात केली. आता ती व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून ऑर्डर मिळवते आणि तिने तयार केलेली कोशिंबीर ग्राहकांना डिलिव्हर करते.

मेघा २२ वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर तयार करते. तिला दिवसातून २०० पेक्षा जास्त ऑर्डर्स मिळतात. आयटी सेक्टर, बीपीओ, तसेच हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून तिला या ऑर्डर येत आहे. मेघा फ्रेश कोशिंबीर लोकांपर्यंत पोहचवते त्यामुळे तिचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

तिच्यासोबत सध्या १५ लोक काम करत आहे. तिने या व्यवसायात फक्त ३५०० रुपये गुंतवले होते. आता याच व्यवसायातून ती महिन्याला सव्वा लाख रुपये कमवत आहे. मेघा प्रमाणेच तुम्हीही तुमच्या शहरात हा व्यवसाय करु शकतात आणि चांगले पैसे कमवू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.