कोल्हापूरमध्ये शेती करून हे दोन तरुण कमवताय महिन्याला ८० लाख; एकदा वाचाच…

0

 

आजच्या काळात अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरी करत आहे. तर अशात काही तरुण शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. आजची ही गोष्ट एका अशाच दोन तरुणांची आहे, जे शेती करुन महिन्याना ८० लाख रुपये कमवत आहे.

कोल्हापुरमध्ये शेती करणारे हे दोघेही तरुण उच्चशिक्षित असुन आयआयटीचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. दोघांनाही पहिल्यापासुन शेतीची आवड होती. त्यासाठी त्यांनी कॅनडा, इस्त्राइल, अमेरिका, चीन, हाँगकाँग, या देशांना भेटी देऊन वेगवेगळ्या शेतींचा अभ्यास त्यांनी केला आहे.

त्याच अभ्यासातुन  कोल्हापुरात देशातील पहिली ऍक्वाफॉनिक म्हणजेच पाण्यावर तरंगणारी शेती तयार केली आहे. हि शेती करणाऱ्या तरुणांचे नाव मयंक गुप्ता आणि ललित झंवर असे आहे.

मयंक गुप्ता हा मुळचा हैद्राबादचा आहे, तर ललित हा मुंबईचा आहे. दोघेही ३१ वर्षांचेच आहे. २०१२ ते २०१८ पर्यंत त्यांना विविध देशांना भेटी दिल्या आणि शेती व्यवसाय सुरु केला. देशभरातील सर्व जिल्ह्यातील माहिती घेतली आणि कोल्हापुरातील हातकणंगले भागात शेती करण्याचा निर्णय घेतला.

ऍक्वाफॉनिक हे एक पाण्याचे छोटे टँक बांधुन त्यात देशी आणि विदेशी भाजीपाला कोकोपीटच्या माध्यमातुन उगवण्याचे तंत्रज्ञान आहे. यात मस्यपालन करुन माशांची जी विष्ठा असते तिचा वापर करुन हि शेती केली जाते.

भाजीपाल्याला जरी मोठे मार्केट असले तरी उत्पादनावर मर्यादा आहे, त्यामुळे दोघांनी १०० शेतकऱ्यांशी १०० एकर जमिनीचा करार केला आहे. त्यासाठी ते पाणी आणि मातीचे परिक्षण करतात, तसेच पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे इथल्या दर बाजारभावापेक्षा अधिक आहे.

मयंक आणि ललित यांनी हि शेती करण्यासाठी १३० टँक बांधले असून यामध्ये जवळपास ३० टन मासे आहे. सर्व माशांची विष्ठा एकत्र केली जाते आणि ते खाद्य शेतीला दिले जाते. या शेतीत ४० प्रकारच्या भाज्या असुन २ लाख २० हजार प्लांट त्यांनी लावले आहे.

या शेतीमधुन दररोज तीन टन भाजीपाला संकलित केला जातो. पुढे हा माल कारखान्याच आणुन त्याचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग केल्यानंतर बाजारपेठांच्या मागणीनुसार आणि शहरांच्या मागणीनुसार पाठवण्यात येतो. मयंक आणि ललितचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असुन ते या शेतीतुन महिन्याला ८० लाख रुपये कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.