वरिष्ठ नारायण सिंह: भारताचा एक विस्मरलेला गणिततज्ञ ज्याने आइन्सटाइनचा सिद्धांत खोडून काढला

0

सगळ्यांना बाहेरच्या देशातील बरेच तज्ञ किंवा संशोधक माहित असतील. पण तुम्ही भारतातील गणिततज्ञ वरिष्ठ नारायण सिंह यांचे ना ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. आज ते जीवंत असते तर ते ७९ वर्षांचे असते. पण ते आता आपल्यासोबत नाहीत.

पण गणितात त्यांनी जे योगदान दिले आहे आणि त्यांनी जे कार्य केले आहे ते लोक कधीही विसरणार नाहीत. जेव्हापण त्यांची चर्चा होईल तेव्हा लोक असेही म्हणतील की त्यांनी जे कार्य केले किंवा त्यांनी जे योगदान दिले तेवढी त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही.

भोजपुरमधील एका छोट्या गुमनाम गावात एका साधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते वर्ष होतं १९४२ चं आणि एप्रिलचा महिना होता. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. ते लहानपणापासूनच हुशार होते. शाळेतसुद्धा ते चर्चेत असायचे.

तेव्हा घरच्यांनी त्यांना एका मोठ्या आणि चांगल्या शाळेत भरती केले. त्यांनी मॅट्रीकमध्ये पुर्ण बिहारमध्ये पहिला नंबर मिळवला होता. नारायण सिंह हे पटनाच्या सायन्स कॉलेजमध्येही खुप प्रसिद्ध होते. त्यांची हुशारी बघून प्रोफेसरसुद्धा प्रभावित झाले होते. ते म्हणाले की हा विद्यार्थी तर बीएससी टॉप करू शकतो.

तेव्हा त्यांना राज्यपालांची समंतीवरून बीएससीच्या शेवटच्या परिक्षेला बसविण्यात आले. त्यानंतर त्यांनी बीएससीमध्ये पुर्ण विद्यापिठात टॉप केले होते. गणिततज्ञ हे शक्यतो एकटे असतात आणि स्वताच्या विश्वात रमणारे असतात. वरिष्ठ गणिततज्ञ नारायण सिंह हे त्याला अपवाद नव्हते.

त्यांचे वडिल पोलिस खात्यात होते. त्या काळात त्यांची काहीच कदर केली गेली नाही. बाहेरच्या देशात जेवढी इज्जत गणिततज्ञांना होती तेवढी भारतात नव्हती. त्यामुळेच त्यांना स्किझोफ्रे निया म्हणजे व्यक्तीमत्व दुभंगाचा आजार झाला होता. १९६३ मध्ये ते पाटणा येथे शिकण्यासाठी गेले होते.

तेथे ते वैज्ञनिकजी या नावानेच प्रसिद्ध होते. महाविद्यालयातील अनेक शिक्षकांना ते त्यांच्या चुका दाखवून देत असत. त्यामुळे प्राचार्यांनी वरिष्ठ नारायण सिंह यांची वेगळी परिक्षा घेतली होती. त्याच काळात अमेरिकी गणिततज्ञ जॉन केली हे पाटण्यात व्याख्याणासाठी आले होते.

तेव्हा त्यांनी चार ते पाच गणिताचे कुटप्रश्न मांडले. वरिष्ठ यांनी ते कुटप्रश्न एका झटक्यात सोडवले. तेव्हा जॉन आश्चर्यचकितच झाले. त्यांनी वरिष्ठांना अमेरिकेत भेटीचे निमंत्रण दिले ते ही स्वखर्चाने. १९६३ मध्ये त्यांनी रिप्रोड्युसिंग केर्नेल ऍण्ड ऑपरेटर्स विथ सायक्लिक व्हेक्टर हा पिएचडीचा प्रबंध सादर केला.

१९६९ मध्ये त्याच विद्यापिठात ते सहयोगी झाले. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पण त्यांच्या पत्नीने त्यांच्या आजारामुळे त्यांची साथ सोडली. असे म्हणतात की त्यांनी आइनस्टाइनचा इ इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत खोडून काढला होता.

पण त्याचे पुरावे सापडले नाहीत कारण तोपर्यंत त्यांना मनोदुभंग झाला होता. भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा मुलभूत संशोधन संस्था, मुंबई, भारतीय सांख्यिकी संस्था कोलकाता या संस्थांमध्ये काम केले. १९७४ मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण नंतर रेल्वेने पुण्यातील भावाकडे जाताना ते बेपत्ता झाले होते.

पाच वर्षांनी ते छाप्रा येथील एका कचराकुंडीजवळ सापडले. अनेक मानसोपचार करणाऱ्या संस्थांनी त्यांना दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या आईने ही परवानगी दिली नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांना त्यांच्यावर चित्रपट बनवायचा होता पण त्यांच्या भावाने त्यांना परवानगी दिली नाही.

पाटण्यातील एका अपार्टमेंटमध्ये चाळीस वर्षे ते मनोदुभंगाने पछाडलेल्या अवस्थेत जीवन जगले. तरीही पुस्तके आणि पेन्सील नेहमी त्यांच्यासोबत असायची. त्यांच्या जाण्याने जास्त काही कोणाला फरक पडला नाही पण त्यांना म्हणावी तशी प्रतिष्ठा मिळाली. आपण एक गणितातला हिरा गमावला. त्यांना नंतर मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.