अभिमानास्पद! चिमुकलीला कोणच रक्त देईना, लग्नाच्या मंडपातून उठून जोडप्याने केले रक्तदान

0

रक्तदान करणे काही मोठी गोष्ट नाही. आज अनेकजण रक्तदान करतात. पण जर रक्तदान केल्याने कोणाचा जीव वाचणार असेल तर ते नक्कीच श्रेष्ठदान ठरेल. असे अनेक किस्से आहेत ज्यामध्ये अनेक लोकांनी रक्तदान करून रूग्णांचा जीव वाचवला आहे.

त्यातल्या त्यात आपण एखाद्या खुप महत्वाच्या कामात असलो आणि त्यातल्या त्यात आपण जर वेळ काढून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी जर रक्तदान केले तर ही खुप मोठी गोष्ट आहे. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेश येथे घडला.

एका जोडप्याने आपल्या लग्नाच्या दिवशी वेळ काढत एक कौतुकास्पद काम केले आहे. त्यांनी लग्नाच्या दिवशीच एका चिमुलकलीचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान केले. उत्तर प्रदेश पोलिस आशीष मिश्रा यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.

आशिष मिश्रा म्हणाले की, एक लहान मुलीला रक्ताची गरज होती. कोणीही रक्तदान करण्यासाठी पुढे येत नव्हतं. कारण, ती दुसऱ्या कोणाचीतरी मुलगी होती. आपली असती तर कदाचित कोणीतरी पुढे आलं असतं.

पण लग्नाच्या दिवशी या जोडप्याने रक्तदान करून एक लहान चिमुकलीचा जीव वाचवला आहे. त्यांनी या जोडप्याचे कौतुक केले आहे. त्यांनी या जोडप्याचा रक्तदान करतानाचा फोटोही सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

या फोटोत नवरदेव रक्तदान करताना दिसत आहे. त्याच्या शेजारी नवरीही नवरीच्या पोशाखात उभी आहे. दरम्यान, आशिष मिश्रा यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून रक्तदात्यांच्या गरजू लोकांना संपर्क करून दिला जातो.

त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकांचा जीव वाचला आहे. या नवविवाहीत जोडप्याचे सध्या नेटकऱ्यांकडून खुप कौतुक केले जात आहे. त्यांच्या कार्याला सलाम केले जात आहे. अनेकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काहींनी लिहिले आहे ग्रेट वर्क! आशिष मिश्रा यांनी २०१७ मध्ये या उपक्रमाला जोडले गेले होते. रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस मित्र अभियान त्यांनी सुरू केले होते. त्यांच्याही कामाचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.