एकेकाळी होता टॉपचा बॉलर, पुढे आई आणि बायकोच्या भांडणात झाले करियर खराब

0

 

भारतीय संघात अनेक खेळाडू असे होऊन गेले आहेत, ज्यांनी दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वात चांगले प्रदर्शन केले आहे, पण त्यांना भारतीय संघात टिकून राहता आले नाही आणि काही वर्षातच त्यांना भारतीय संघातून बाहेर पडावे लागले.

संघात चांगले प्रदर्शन करुनही भारतीय संघात टिकून न राहणे याचे अनेक कारण आहेत म्हणजे खेळाडूंचे संघासोबतचे वागणे, त्याचे संघातील अंतर्गत संबंध. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका खेळाडूची गोष्ट सांगणार आहोत, ज्याचे भारतीय संघातले प्रदर्शन तर चांगले होते, पण त्याचे क्रिकेटमधले करियर संपले ते म्हणजे त्याच्या आईच्या आणि बायकोच्या भांडणामुळे.

भारतीय संघात महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या खेळाडूचे नाव मनप्रीत गोनी असे आहे. मनप्रीत भारतीय संघात एक बॉलर होता, बॉलिंग करताना त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना तंबूत पाठवले होते, आपल्या क्रिकेटच्या सुरुवातीला त्याने चांगलेच नाव कमावले होते.

मनप्रीतची ओळख तगडा बॉलर आणि धडाकेबाज बॅटींग करणारा खेळाडू अशी होती, त्याने आयपीएल संघात धोनीच्या नेत्वृताखाली चांगली खेळी केल्यामुळे त्याला भारतीय संघात स्थानही मिळाले होते. पण त्याला ते स्थान जास्त काळ टिकवून ठेवता आले नाही.

सुरुवातीला मनप्रीत पंजाबच्या संघाकडून रणजी खेळायचा, २००७ मध्ये त्याने फर्स्टक्लासमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने त्याला २००८ च्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघात जागा मिळाली. त्या सीजनमध्ये त्याने १६ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या, तसेच मोठमोठ्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला होता.

मनप्रीतची क्रिकेटची खेळी चांगली सुरु होती, पण त्याच्य वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या क्रिकेट करियरवर मोठा परिणाम झाला. पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला, त्यामुळे तो अडचणीत आला होता, अशात त्याचे आईसोबतही भांडण व्हायचे, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आणि त्याची खेळी खराब झाली.

२०१५ मध्ये मनप्रीत अमेरिकेत गेला, तिथे तो विविध स्पर्धेंमध्ये खेळत होता, पण नंतर तो २०१६ मध्ये पुन्हा भारतात आला आणि त्याने पंजाबकडून खेळण्यास सुरुवात केली. त्याने रणजी सामन्यात दमदार खेळी केली, त्यामुळे तो पुन्हा आयपीएमध्ये आला पण त्याला आयपीएलचे जास्त सामने खेळता आले नाही.

मनप्रीतची खेळी चांगली नसल्याने स्वत:नेच २०१९ मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, आता मनप्रीत टी-ट्वेंटी लीगचे सामने खेळत आहे. तो सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड सिरिज रोड सेफ्टीमध्ये खेळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.