आत्महत्या करायला निघालेले मनोज वाजपेयी कसे बनले बॉलिवूडचे स्टार, वाचा संघर्षकथा

0

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावणे खुप कठीण आहे असे म्हणतात. कारण कोणत्याही ओळखीशिवाय स्वताची वेगळी ओळख निर्माण करणे ही खुप मोठी गोष्ट आहे. अनेक जण आपली ओळख निर्माण करण्यात अयशस्वी झाले पण काहींना यशाचे शिखर गाठले.

इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे मनोज वाजपेयी. बिहारचा एक साधारण व्यक्ती बॉलिवूडचा इतका मोठा स्टार कसा झाला हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला सांगितलेल्या मुलाखतीत आपली संघर्षकथा सांगितली आहे.

बिहारमधील एका गावात पाच भावंडांसह ते लहानसे मोठे झाले. त्यांच आयुष्य खुप साधं होतं. पण जेव्हा कधी ते शहरात जायचे तेव्हा ते सिनेमा पाहायला नक्की जायचे. मनोज हे अमिताभ बच्चन यांचे खुप मोठे फॅन होते आणि त्यांना अमिताभ यांच्यासारखे बनायचे होते.

ते जेव्हा ९ वर्षांचे होते तेव्हाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती. पण इतकी मोठी स्वप्न पाहण्याची त्यांची ऐपत नव्हती. वयाच्या १७ वर्षी ते ते दिल्ली विद्यापिठात दाखल झाले होते. तिथे ते नाटकात काम करायचे पण हे त्यांच्या घरच्यांना माहित नव्हते.

एकदा पत्र लिहून त्यांना आपल्या वडिलांना सांगितलं की मला अभिनयक्षेत्रात काम करायचे आहे. तेव्हा त्यांचे वडील त्यांच्यावर रागावले नाहीत. उलट त्यांनी फी भरण्यासाठी २०० रूपये पाठवले होते. एकदा त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

पण त्यांचा अर्ज तीन वेळा नाकारण्यात आला होता. त्यावेळी सतत त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. त्यांची मनस्थिती पाहून त्यांचे मित्र त्यांच्या शेजारीच झोपायचे. ते आत्महत्या करतील या विचाराने त्यांचे मित्र त्यांना कधीच एकटे सोडत नव्हते. एकदा मनोज चहाच्या टपरीवर चहा पित होते.

तेव्हा तिग्मांशू धुलिया तेथे त्यांना शोधत आले होते. दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांना बॅंडिट क्वीन चित्रपटाची ऑफर दिली आणि ते मुंबईत आले. मायनगरी मुंबईत राहणे काही सोपे नव्हते. मनोज आपल्या पाच मित्रांसोबत एका चाळीत राहायचे. सुरूवातीच्या काळात त्यांना काहीच काम मिळत नव्हतं.

एका दिग्दर्शकाने तर त्यांचा फोटो फाडून फेकून दिला होता. इतक्या संघर्षानंतर जेव्हा त्यांना पहिला शॉट मिळाला होता तेव्हा त्यांना तेथून त्यांना हाकलून लावण्यात आले होते. ते हिरोसारखे दिसत नाहीत म्हणून त्यांना कोणीच काम देत नव्हतं. घराचे भाडे भरण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसै नव्हते.

साधा वडापाव खाण्यासाठी त्यांच्याकडे पैसै उरले नव्हते. पण त्यांचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते. अखेर त्यांना महेश भट्ट यांनी संधी दिली. तेव्हा त्यांना एका टीव्ही एपिसोडचे दीड हजार रूपये मिळत होते. त्यानंतर त्यांना सत्या या चित्रपटाची ऑफर मिळाली. सत्या चित्रपटामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी स्वताचे घर विकत घेतले.

स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द असेल तर संघर्ष किती आहे याची पर्वा करायची नाही. त्यावेळी फक्त ९ वर्षांच्या बिहारी मुलाचा विश्वास महत्वाचा होता, असं मनोज वाजपेयी यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.