रत्नागिरीतील मनोज पवार त्यांचा वाढदिवस स्मशानात करतात साजरा, कारण वाचून बसेल धक्का

0

 

भुता खेतांच्या गोष्टी एकूण अनेक लोक घाबरत असतात. अनेक लोकांना जगात भूत असतात, असा विश्वास देखील आहे. पण अजून पर्यंत हे सिद्ध झाले नाही, अनेक ठिकाणी भूतांची भीती दाखवून  काळा बाजार केला जातो. पण काही लोक तरीही भूत या जगात आहे, असा विश्वास ठेवत असतात.

अनेक लोक तर स्मशानभूमीत जाण्यासाठी देखील घाबरतात. मात्र भूत वगैरे काही नसते, हे पटवून देण्यासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरीत राहणाऱ्या पत्रकाराने एक अजब शक्कल लढवली आहे. पत्रकार मनोज पवार हे गेल्या २४ वर्षांपासून आपला वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करत आहे.

मनोज पवार गेल्या २४ वर्षांपासून म्हणजेच १९९६ पासून आपला वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्याची मोहिम राबवत आहे. हे करण्यामागे त्यांना असे सिद्ध करायचे आहे की, जगात भूत, आत्मा, अशा कोणत्याच गोष्टी नाहीये.

वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार हे रात्री १२ वाजता स्मशानभूमीत जातात. जसे आपण वाढदिवसाच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद घेतो तसेच पवार हे स्मशानात जाऊन तिथे अगरबत्ती लावतात. तसेच तिथे केक कापून किंवा आणलेले गोड पदार्थ वाटून खातात.

१९९६ मध्ये त्यांनी पत्रकारिता करायला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांना काहीतरी नवखे करायचे होते. तेव्हा त्यांना वरिष्ठ लेखक माधव गावंकर यांनी ही कल्पना सुचवली आणि तेव्हा पासून मनोज पवार यांनी मध्यरात्री आपला वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यास सुरुवात केली.

गेल्या २४ वर्षांपासून मनोज पवार आणि सहकारी मनोज यांचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करत आहे. त्यामुळे अजून तरी आम्हाला कुठली भुतं वगैरे दिसली नाही, असे मनोज यांचे सहकारी म्हणतात.

तसेच अनेक लोकांचे म्हणणे असते की स्मशानभूमीत काही खाऊ नये, त्याने बाधा होते. अशा अंधश्रद्धाला देखील मनोज पवार विरोध करतात, आणि स्मशानभूमीत वेगवेगळ्या गोष्टी खातात. स्मशानभूमीत काही खाल्ल्याने आतापर्यंत मला अजून कुठलीही बाधा झालेली नाही, असे मनोज पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.