एकेकाळी उपाशी पोटी झोपणारे बाजपेयी कसे झाले बॉलिवूडचे सुपरस्टार, वाचा…

0

 

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या मेहमतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमवले आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे मनोज बायपेयी.

आज मनोज बायपेयी यांचे खुप चाहते आहेत. पण एकवेळ अशी होती जेव्हा मनोज बायपेयी यांना कोणी ओळखत नव्हते, तरीही त्यांनी तेव्हा बिहार ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई प्रवास केला आणि चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली.

मनोज बायपेयी आता त्यांच्या अभिनयाच्या जोरावर एक लक्झरी लाईफ जगत आहे. त्यांनी गँग्स ऑफ वासेपुर, सुरज पे मंगल भारी, भोसले, सत्या, अलिगढ, स्पेशल २६ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, तेव्हा यामध्ये त्यांना भोसले चित्रपटामध्ये केलेल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

१९९८ मध्ये रामगोपाल वर्मा यांनी काढलेल्या सत्या या चित्रपटातून मनोज बायपेयी यांना प्रसिद्ध मिळाली होती. सत्या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सहअभिनेताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

मनोज बाजपेयी यांना लहानपणापासूनच अभिनेता बनायचे होते. त्यांची ही आवड बघून शेजारी राहणारे लोक आणि त्याचे नातेवाईक हसायचे. पण आज त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे.

जेव्हा बाजपेयी मुंबईला आले होते, तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा ते उपाशी पोटीच झोपले आहे. पण ते म्हणतात ना जर माणसात ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर त्याला त्यापासून कोणीच रोखू शकत नाही. असेच काहीसे झाले मनोज बायपेयी यांच्यासोबत.

मनोज बाजपेयी यांना त्यांच्या चित्रपटातल्या अभिनयातून, वेब सिरिज, ब्रँड प्रमोशन आणि जाहिरातीतून पैसे मिळतात. मिळालेल्या माहितीनूसार मनोज बाजपेयी एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये घेतात.

मुंबईच्या अंधेरीत ऑबेरॉय टॉवरमध्ये त्यांचे एक अलिशान घर आहेत, ज्याची किंमत ८ करोड रुपये इतकी आहे. हे घर त्यांनी २०७ मध्ये खरेदी केले होते, या घरामध्ये ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत राहतात.

मनोज बाजपेयी यांच्याकडे अनेक अलिशान गाड्या आहेत, त्यामध्ये बीएमडब्लु ३ सिरिज, स्कॉर्पियो आणि फॉर्चुनर अशा गाड्या आहेत, ज्यांच्या किंमती लाखों रुपयांमध्ये आहे. तसेच त्याचे वर्षाची कमाई १४६ कोटी रुपये इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.