नाद खुळा! फुलटाईम जॉब करुन या पठ्ठाने केली युपीएससी परिक्षा पास

0

 

आपण अनेकदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तासनतास अभ्यास करताना बघत असतो. तरीही अनेकांना ती उत्तीर्ण होणे कठीण जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत ज्या तरुणाने फुल टाईम जॉब करुन युपीएससी परिक्षा पास केली आहे.

या तरुणाचे नाव मनीष कुमार असे आहे. मनीषने २०१७ च्या युपीएससी परिक्षेत ६१ वा रँक मिळवला आहे. मनीषने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नातच ही स्पर्धा परीक्षा पास केली आहे. पण हा प्रवास त्याच्यासाठी वाटतो तितका सोपा नव्हता. पण त्याच्या अथक मेहनतीमुळे त्याला हे यश मिळाले आहे.

मनीषने नोकरी करत असताना युपीएससी परिक्षेचा अभ्यास केला आणि त्याने ही परिक्षा पास केली आहे. नोकरी करत असताना आपल्याला अभ्यासाचे नीट नियोजन करणे जास्त गरजेचे असते, असे त्याने म्हटले आहे.

तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्टयांचे नियेजन करणेही गरजचे आहे. कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा. तसेच रोज ऑफिसला जाताना कमीत कमी एक तास वाचून जायला हवे म्हणजे दिवसभर ज्या विषयाचा अभ्यास केला आहे, त्याचे रिवीजन करता येते.

ज्ञान फक्त पुस्तकातूनच नाही तर तुमच्या निरिक्षणातूनही मिळते. त्यामुळे नेहमीच तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यातून बरीच माहिती आपल्याला मिळत असते.

तसेच ऑफिसमध्ये असताना ऑडिओ नोट्स तयार केल्या पाहिजे, तसेच त्या ऐकल्या पाहिजे. ऑफिमध्येच नाही तर मनीष जिमला गेला असातानाही ऑडिओ नोट्स ऐकत असतो. मनीष जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ ऑफिस वेळेतून काढतो आणि अभ्यास करतो.

नोकरीला नेहमीच तुमचा प्लस पॉईंट समजले जाते, कारण अभ्यास करत असताना आपल्याला पैसेही मिळत असतात. तसेच तुम्ही जेव्हा नोकरी करुन युपीएससी पास करतात, तेव्हा तुम्ही लोकांसमोर एक नवा आदर्श उभा करत असतात, असेही मनीषने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.