तूच रे तूच! हा मुस्लिम मावळा शिवनेरीवरून २०० किलोमीटर पायी गावात आणतो शिवज्योत

0

आज आम्ही तुम्हाला अशा मावळ्याबद्दल सांगणार आहोत जो गेल्या सात वर्षांपासून दर शिवजयंतीला २०० किलोमीटर चालून शिवनेरीवरून शिवज्योत गावात आणत आहे. विशेष म्हणजे हा मावळा मुस्लिम आहे आणि त्याचे नाव समीर शेख असे आहे.

दरवर्षी तो अशा अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरा करत आहे. जातीपात न मानता अशा प्रकारचा उपक्रम राबवून त्याने सगळ्यांना हा संदेश दिला आहे की सगळ्यांनी सलोख्याने राहिले पाहिजे.

समीर शेख या उच्चशिक्षित तरुणाची छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवापाड श्रद्धा आहे. मागील सात वर्षांपासून समीर नियमाने हे काम करत आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर करून त्यांचा सामाजिक सलोख्याचा संदेश दृढ करण्याचा त्याचा उद्देश आहे.

शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर असलेली शिवज्योत घेऊन तो दरवर्षी बीड जिल्ह्यातील सावंगी पाटण गावात जातो. यासाठी तो शिवनेरी येथून एक दिवस आणि एक रात्रीचा प्रवास न थकता करतो.

यावेळीही तो पोहोचला आणि त्याच्यासोबत गावातील त्याचे काही सवंगडी होते. सगळे मिळून ५० मावळे त्याच्यासोबत होते. समीर म्हणाला की, शिवरायांचे विचार कायम माझ्यासोबत असतील. ते माझे दैवत आहेत.

सात वर्षांपासून गावातील तरुणांसोबत मी शिवनेरीवरून पायी शिवज्योत घेऊन येतो. शिवनेरीवर गेल्यावर जेव्हा सगळ्याना कळते मी एक मुस्लिम मावळा आहे तेव्हा मला खूप मान सन्मान दिला जातो. आमची सर्व व्यवस्था करण्यात येते.

शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवज्योत आणण्याचा मान मला मिळाला याचा मला गर्व आहे. हे कार्य असेच अविरत चालू राहील असे समीर म्हणाला आहे. आज महाराष्ट्राला अशाच मावळ्यांची गरज आहे. लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.