बॅंक ऑफ अमेरिकाची नोकरी सोडली आणि सुरू केला दुधाचा व्यवसाय, आता कमावतोय ३७ लाख

0

बँक ऑफ अमेरिका ही जगातील ८ व्या क्रमाकांची सगळ्यात मोठी बँकींग संस्था आहे. या बँकेत काम करण्याचे स्वप्न अनेक लोक पाहतात. कारण त्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाखोंच्या घरात पगार आहे.

पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने ही नोकरी सोडली आणि चक्क दुधाचा व्यवसाय सुरू केला. आणि हा व्यक्ती भारतीय आहे. त्याने या दुधाच्या व्यवसायात इतकी प्रगती केली आहे की त्याला आता ३७ लाख रूपये मिळत आहे.

आज आम्ही तुम्हाला त्यांची यशोगाथा सांगणार आहोत. वन इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. राजस्थान येथील बांसवाडा शहरातील रहिवासी असणारे अनुकूल मेहता यांनी आंतरराष्ट्रीय बँकेतील असणारी नोकरी सोडली आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला.

आता अनुकूल बक्कळ पैसा कमवत आहेत आणि त्यांच्या हाताखाली आता १० लोक काम करत आहेत. त्यांनाही आता रोजगार मिळत आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग अँड फायनान्समधून पदवी घेतली होती.

त्यानंतर त्यांना बँक ऑफ अमेरिकेत नोकरी मिळवली. तेव्हा त्यांचे पॅकेजही लाखो रूपये होते. त्यांनी बँक ऑफ अमेरिकेत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी एचएसबीसी बँकेत आणि सनकार्प बँकेत काम केले बँकेत काम केले.

त्यांचा धाकटा भाऊही त्यांच्यासोबत कामाला लागला. काही काळानंतर त्यांच्या भावाची बदली लंडन येथे झाली. यानंतर अनुकूलने नोकरी सोडली आणि तो बांसवाडा येथे आला. धाकटा भाऊ सोडून गेल्याने त्याला बरे वाटत नव्हते.

त्यांनी नोकरी सोडण्याआधीच २०१७ मध्ये गौशाला सुरू केली होती. एक वर्षानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि आपल्या गावाला येऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला. जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला होता तेव्हा त्यांच्याकडे ७ गायी होत्या.

आता त्यांच्याकडे १३५ गायी आहेत. पण सुरूवातीला त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. एकेकाळी त्यांच्याकडे आपल्या गायींना चारा देण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. पण जेव्हा दुधाची मागणी वाढली तेव्हा त्यांनी खुप मेहनत केली. आता ते दररोज १५० लिटर दुधाची विक्री करतात.

त्यांच्या दुधाचा दर ७० रूपये लिटर आहे. म्हणजे दिवसाला त्यांना यातून १० हजार ५०० रूपये मिळतात. आसपासच्या भागात दुधाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी लोकांना कामावर ठेवले आहे. अनुकूल यांनी फक्त देशी गायी पाळल्या आहेत. कारण देशी गायींचे दुध आरोग्यासाठी चांगले असते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.