सर्व सरकारी परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारा अखंड स्वरूप पंडित माहितीये का?

0

 

एमपीएससी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होयचे स्वप्न अनेक विद्यार्थी बाळगत असतात. त्यासाठी अनेक लोक मेहनत घेत असतात. दहा-दहा वर्षे अभ्यास करूनही अनेकांना ही परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही, पण तुम्हाला माहितीये का अखंड स्वरूप पंडित यांनी गव्हरमेंटच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आहे.

अखंड हे सुरुवातीला एकदम साधे विद्यार्थी होते, त्यांचे गुण देखील एव्हरेज विद्यार्थ्यांसारखेच होते. मात्र आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने त्यांनी गव्हरमेंटच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आहे.

आईएस, यूपीएससी यांसारख्या अनेक परीक्षा अखंड यांनी उत्तीर्ण केल्या आहे. इतकेच काय तर अनेक सरकारी परीक्षांमध्ये तर त्यांनी टॉपसुद्धा केले आहे. या परीक्षांमध्ये GATE मध्ये ६ वी रँक, NET मध्ये रँक ३, MPPSC मध्ये रँक ४, HPPSC मध्ये रँक ३, UPHDB मध्ये रँक १, SSC रँक १, MUMBAI मेट्रो रँक १ अशा रँक अखंड यांनी मिळवल्या आहे.

उत्तर प्रदेशच्या बरेली गावात अखंड यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी इंजिनिअरिंग करण्यासाठी गव्हरमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना या शिक्षणात रस नव्हता.

ते शिक्षण घेत होते, पुढे जाऊन त्यांना आयुष्यात शिक्षण खूप महत्वाचे आहे, हे त्यांना आता कळले होते. त्यामुळे त्यांनी पुढे यूपीएससी करण्याचे ठरवले. तसेच यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आणि त्यांच्या या गोष्टीचा खर्च घरच्यांवर येऊ नये म्हणून त्यांनी मुलांना शिकवण्यास सुरुवात केली.

स्वरूप यांना मुलांना शिकवता शिकवता काही पैसे मिळू लागले, तसेच त्यांच्या ज्ञानात यामुलर भर पडू लागली. त्यामुळे त्यांची यूपीएससी देण्याची तयारी देखील वाढत गेली. पुढे त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. तसेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला ते जॉईन झाले.

एकदा यूपीएससीची परीक्षा पास केल्यानंतर त्यांना बाकीच्या परीक्षा सोप्या वाटायला लागल्या. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या सरकारी परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि त्यांनी त्यात चांगले यश मिळवले. त्यांनी त्यांच्या जिद्दीवर आपल्या यशाची उंची गाठली आहे.

त्यांच्या या यशासाठी त्यांनी काही तयारी देखील केली होती. ते आपल्या अभ्यासाचे विशेष नियोजन करायचे. कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कितीवेळ करायचा आहे, यासाठी ते दर आठवड्याला नीट नियोजन करून ठेवायचे. दिवसातून ६ ते ७ सात ते अभ्यास करत होते.

अखंड हे दिवसातून ६ ते ७ सात अभ्यास करत होते, मात्र ते कधीच एकसोबत इतक्या वेळ अभ्यासाठी नाही बसले. अखंड यांच्यानुसार अभ्यास करताना मध्ये ब्रेक घेणे गरजेचे आहे. त्यासाठीत्यांनी एक टाईमटेबल बनवून ठेवलेले होते, त्यामुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण होयचा.

आज अखंड पंडित एक कैटेलिस्ट नावाचे इन्स्टिट्यूट कोचिंग सेंटर चालवत आहे. तसेच ते एक मोटीवेशनल स्पीकर देखील आहे. अखंड यांच्या या गोष्टीमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे, तसेच अनेकांना यश देखील प्राप्त झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.