ताडीने बदलले नशीब, दीड एकराच्या पडीक जमिनीवर ताडीची लागवड करून कमावले लाखो

0

प्रकाश पाटील भिलवंडे या शेतकऱ्याने दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड केली आहे. ते बिलोली तालुक्यातील नरसी या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या शेतात ताडीच्या १२०० झाडांची लागवड केली आहे.

या लागवडीतून त्यांना ८ ते १० लाखांचे उत्पन्न वर्षाला मिळते. विशेष म्हणजे ताडीच्या या झाडांना कोणतीही मशागत करावी लागत नाही. त्यांना फक्त योग्य प्रमाणात पाणी आणि त्यांचे संगोपन करून शेताच्या बांधावर ही झाडे लावली तर यातून भरगोस उत्पन्न मिळू शकते.

नीरा विक्रीतून एकेकाळी नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असे. त्यामध्ये बिलोली, देगलूर, धर्माबाद या तालुक्यांचाही समावेश होता. काही जिल्ह्यातून कोट्यावधी रुपयांचा महसूल गोळा होत असे.

काही काळानंतर अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात निराची झाडे आता जास्त उरली नाहीत. हे गणित त्यांना लक्षात आलं आणि भिलवंडे यांनी निराच्या झाडांची लागवड केली. त्यांचे म्हणणे आहे की, नामशेष झालेली ही झाडे लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

जर वनविभागाच्या नर्सरीमध्ये ही झाडे वाढवली आणि गरजू शेतकऱ्यांना दिली तर त्यातून शासनाचाच महसूल वाढेल. त्यातून अनेक बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

तसे पाहायचे झाले तर नीरा ही आरोग्याच्या दृष्टीनेही खुप गुणकारी आहे. पहाटेच्यावेळी निरा प्यायल्याने पोटाच्या संबंधितले अनेक विकार दूर होतात. मुतखड्यासाठी निरा अत्यंत गुणकारी मानली जाते. डॉक्टर नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात पण त्यापेक्षा १० पट जास्त न्युट्रिशन नीरामध्ये असते.

नदीच्या शेजारी, नाल्यांच्या शेजारी तसेच ओढ्याच्या काठावर निराची झाडे चांगल्या प्रकारे येतात. या झाडांना चांगल्या प्रतीच्या जमिनीचीही गरज नाही अशी माहिती भिलवंडे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.