स्वताच्याच कंपनीच मन लागत नव्हते, आता स्ट्रॉबेरीची शेती करून कमावतोय लाखो

0

स्वताची कंपनी असताना आणि स्वता एक बांधकाम व्यवसायिक असाताना त्यात मन लागत नव्हते म्हणून कंपनीच्या मालकाने शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांचा हा निर्णय बरोबर होता. आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

ही कहाणी आहे शशिधर चिक्कापा या शेतकऱ्याची. त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्यांनी मागील वर्षीच शेतीला सुरूवात केली आहे. ते सध्या स्ट्रॉबेरीसह एक एकरमध्ये चार ते पाच फळांचे उत्पादन घेत आहेत.

ते सध्या तीस टन स्ट्रॉबेरी पिकवत आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांचे आहे. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी काही दिवस खाजगी कंपनीत काम केले आणि नंतर त्यांनी स्वताची बांधकाम कंपनी सुरू केली.

जवळपास नऊ वर्षे महाराष्ट्रात काम केले. त्यांनी खुप पैसै कमावले पण त्यांचे आयुष्य समाधानी नव्हते. त्यांनी सांगितले की, मराहाष्ट्रात काम करत असताना स्ट्रॉबेरी लागवडीची माहिती त्यांनी मिळवली. ते महाबळेश्वर येथे राहत होते.

त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड खुप होत असे. त्यांच्याही मनात विचार आला की आपण स्ट्रॉबेरी शेतीचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यांनी वर्षभर स्ट्रॉबेरी शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी एका एजंटच्या माध्यमातून बाहेरच्या देशातून स्टॉबेरीची पिके विकत घेतली.

त्यांनी आधी २५० रोपांची लागवड केली. जास्त पावसामुळे त्यांच्या बऱ्याच रोपांचे नुकसान झाले. त्यांना बरेच लोक म्हणाले की या हवामानात स्ट्रॉबेरी पिकवणे शक्य नाही. ते फक्त थंड प्रदेशात उगवते. परंतु त्यांनी हार मानली नाही.

धारवडसारख्या उष्ण भागात त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. आता ते अनेक लोकांना याबद्दल प्रशिक्षण देत आहेत. आता त्यांच्याकडे ३० हजारांपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीची रोपे आहेत. ते चार स्ट्रॉबेरीच्या पिकांची लागवड करतात. ते जेली, जाम, चॉकलेट तयार करतात आणि बाजारात पुरवतात.

ते रोपांची विक्रीही करतात. त्यांच्या एका झाडाची किंमत १० रूपये आहे. आज त्यांनी अनेक फूट सुपर मार्केट्समध्ये ऍडव्हान्स बुकींग केली आहे. लवकरच ते ऑनलाईन मार्केटमध्ये उतरणार आहेत. शशीधर यांच्यसोबत सुमारे २० लोक काम करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.