३ एकरची शेती झाली ३०० एकरची, वाचा औषधी वनस्पतींची शेती करणाऱ्या अशोक चव्हाणांबद्दल..

0

कोरोनाकाळात हर्बलच्या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मेरठमध्ये एक शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करून महिन्याला लाखो रूपये कमवत आहे. दौराला येथील मटौर गावातील रहिवासी असलेले अशोक चव्हाण उप्र आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या भागात ३०० एकरमध्ये ते औषधी वनस्पतींची शेती करतात.

विदेशातून लोक त्यांची शेती पाहण्यासाठी येत असतात. औषधी वनस्पतींतून ते महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत आणि त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भारती हर्बल्सने त्यांच्या कार्यावर एक डॉक्युमेंटरीसुद्धा बनवली आहे.

अशोक चव्हाण यांनी सांगितले की त्यांचे आजोबा आधी वैद्य म्हणून काम करत असत. त्यातूनच त्यांना औषधी वनस्पतींची शेती करण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर त्यांनी ३ एकरात हळद आणि तुलशीची शेती करण्यास सुरूवात केली.

पण एक काळ असा आला होता की त्यांना आपल्या घरातील सामान विकावे लागले होते. पण काही दिवसांनी त्यांच्या पिकांना मागणी आली. नंतर ती मागणी वाढतच गेली आणि आज ते अनेक राज्यांमध्ये औषधी वनस्पतींची शेती करत आहेत.

ते सध्या फ्रीमध्ये या शेतीचे प्रशिक्षण तरूणांना देत आहेत. अशोक चव्हाण सध्या अश्वगंधा, हळद, पिपळी, ब्राम्ही, स्टीविया, शतावरी, कालमेघा, गोरखमुंडी, लेमनग्रास, कोंच आणि विष्णुकांता सारख्या ३२ प्रकारच्या औषधी वनस्पतींची शेती करत आहेत.

ते देशातील बऱ्याच मोठ्या कंपन्यांना औषधे वनस्पती पुरवण्याचे काम करतात. ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसुद्धा करतात. त्यांचे म्हणणे आहे की, औषधी वनस्पती शेतकऱ्यांसाठी खुप लाभदायक ठरत आहेत.

ज्या शेतकऱ्यांची जमीन कमी आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्या मेरठमधील अनेक शेतकऱ्यांकडून वनस्पती खरेदी करतात. उद्यान विभागही याला प्रोत्साहन देत आहे.

या कंपन्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्याकडून माल खरेदी करतात. या ठिकाणी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्यांना बोलावले जाते. ते थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधतात.

Leave A Reply

Your email address will not be published.