आल्याचं केलं सोनं! आल्याची शेती करून कमावले करोडो रूपये, वाचा यशोगाथा

0

व्यवसायाला कोणताच जात किंवा धर्म नसतो आणि कोणताच व्यवसाय वाईट नसतो. शेतीचेसुद्धा तसेच आहे. शेती हा भारतातील सर्वात महत्वाचा व्यवसाय आहे. भारतात सगळ्यात जास्त शेती केली जाते.

पण काहीवेळा शेतात काहीच नाही पिकले तर खाणार काय असा प्रश्न निर्माण होतो. पण शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही हे सुद्धा खरे आहे. ज्याच्याकडे आज शेती आहे तो सगळ्यात नशीबवान माणूस.

जर तुम्ही आधुनिक पद्धतीने आणि योग्य नियोजन करून शेती केली तर तुम्हाला कोठेही नोकरी करायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आधुनिक पद्धतीने शेती करून करोडो रूपये कमावले आहेत. सुनील जाधव असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

त्यांनी आल्याची शेती करून एक नवा आदर्श उभा केला आहे. सुनील जाधव यांनी सुरूवातीपासूनच व्यवसाय करण्यास सुरूवात केली होती. त्यांनी सुरूवातीला अंडे विकले होते. त्यात त्यांना असे कळले की आपण व्यवसाय करूनही आपला उदरनिर्वाह करू शकतो. मग त्यांनी शेती करण्याचे ठरवले.

अभ्यासपुर्ण शेती करून ते आज देशातील प्रगतीशील शेतकरी बनले आहेत. तीन ते चार वेळा आळवणी आणि मग एकदा किंवा दोनदा भर अश्या अनेक गोष्टी करून त्यांनी आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

दुष्काळी भागातही चांगल्या प्रकारे शेती कशी करावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी शेततळ्यातून पाण्याची व्यवस्था केली आहे. सुरूवातील त्यांनी सायकलवरून प्रवास करून अंडे विकले.

त्यांनी खुप कष्ट केले आहेत. त्यांचे जीवन खुप संघर्षाने भरलेले आहे. जेव्हा १९९६ साली त्यांचे वडिल रिटायर होऊन घरी आले तेव्हा त्यांनी पान टपरी आणि अंड्याचा व्यवसाय सुरू केला. काही वर्षे सुनिल यांनीही अंडे विकले पण नंतर त्यांना हे काम नको वाटत होते.

तेव्हा त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांचे आल्याचे शेत पाहिले आणि त्यांना वाटले आपणही हे करू शकतो. त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या शेतात आल्याचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आल्याचे विक्रमी उत्पादन काढले.

आधुनिक पद्धतीने शेती करून ते आज करोडो रूपये कमवत आहेत. एकेकाळी कर्जबाजारी होऊन दिवस काढले होते पण आज त्यांच्या या कामगिरीमुळे लोक त्यांचे आदराने नाव घेतात.

Leave A Reply

Your email address will not be published.