कोण म्हणतं सेंद्रिय शेती परवडत नाही, दहा गुंठ्यात सेंद्रिय शेती करून कमावले सव्वा लाख

0

अनेक शेतकऱ्यांना वाटते की सेंद्रिय शेती खुप खर्चिक असते. पण रासायनिक शेती करून अनेक शेतकरी आपल्या जमिनीला नापिक बनवत आहेत. पण असे अनेक शेतकरी आहेत जे सेंद्रिय शेती करून बक्कळ पैसा कमवत आहेत.

शेती व्यवसायाला जर कष्टाची आणि कल्पकतेची जोड दिली तर शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही. याचे उत्तम उदाहरण आज आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ऐनापूर गावातील एक तरूणाने सेंद्रीय शेती करून बक्कळ पैसा कमावला आहे.

त्याने रासायनिक खतांना फाटा देऊन अशी सेंद्रीय केली की भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेऊन तानाजी चौगुले यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतली आहे. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी बाकीचे शेतकरी त्यांच्या शेतात गर्दी करत आहेत.

ग्रामपंचायतीचे अभ्यासगटही त्यांची शेती पाहण्यासाठी येत आहेत. तानाजी यांचा एका सामान्य शेतकरी कुंटुबात जन्म झाला होता. त्यांनी गंवडी कामासोबत शेतीची आवड जोपासली. गेली अनेक वर्षे ते भाताची शेती व पांरपारिक उसाची शेती करत होते.

त्यांनी सुरूवातील सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. सुरूवातीला दहा गुंठयात त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि अवघ्या दहा गुंठ्यात त्यांनी १ लाख ३० हजारांचा नफा मिळवला आहे.

यातून त्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे कळाले. त्यामुळे त्यांनी आणखी दहा गुंठ्यात टॉमेटो, वांगी, गवार, शिमला मिर्ची, कोबी असा भाजीपाला अशी पिके चांगल्या प्रकारे पिकवली आहेत. विशेष म्हणजे ते जी सेंद्रिय औषधे पिंकावर फवारतात ती त्यांनी घरीच तयार केली आहेत.

गांडूळ खत, पिकलेल्या उंबरापासून टॉनिक, मच्छी व गुळापासून नत्र, फुटव्यासाठी अंडी, लिंबूमिश्रीत रसायन अशी अनेक सेंद्रिय खते ते घरीच तयार करतात. तसेच ठिबक सिंचनाने त्यांच्या उत्पादन खर्चात घट झाली आहे. रोज दोन तास ते शेतीसाठी देतात.

अनेकजण म्हणतात की सेंद्रिय शेती परवडत नाही पण तानाजी यांनी हा शब्द खोटा ठरवून दाखवला आहे. सध्या पुर्ण गावात त्यांचीच चर्चा होत आहे. त्यांची खते विकत घेण्यासाठीही लोक गर्दी करू लागले आहेत. अनेक लोक त्यांच्यामुळे आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.