आर्मीमध्ये भरती व्हायचे स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणून शेतीत केला भन्नाट प्रयोग, कमावले लाखो

0

आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याला आर्मीमध्ये भरती व्हायचे होते पण त्यांचे हे स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याचे नाव आहे सुरेंद्र पाल सिंग.

त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते १०० एकरपेक्षा जास्त जागेवर इंटीग्रेटेड फार्मिंग करत आहेत. ते अनेक पिकांची लागवड करतात. त्यामध्ये फळे, भाज्या, धान्य, गहू आणि कापूस यांची लागवड करतात.

यातून त्यांना दरमहिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडिल सैन्यामध्ये होते. म्हणून सुरेंद्र यांनाही सैनिक व्हायचे होते. ते म्हणाले की माझ्या गावातील लोक एकतर सैन्यात जातात किंवा शेती करतात

. मलासुद्धा सैन्यात जायचे होते. मी सैनिक स्कुलची परिक्षा पास केली पण त्यांना अतिंम परिक्षा पास करता आली नाही. यानंतर त्यांनी एनडीएमध्ये ट्राय केले पण तिथेही त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

पुर्वी त्यांचे कुटुंब पारंपारिक शेती करत असे. सुरूवातीला त्यांनी पारंपारिक शेती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय आणि इंटीग्रेटेड शेती केली. त्यांनी आपल्या जमिनीवर काही भागात वेगवेगळ्या जातीच्या पिकांची लावगड केली आणि बागकाम करण्यास सुरूवात केली.

दुसऱ्या भागात कापूस आणि उर्वरित जमिनीवर गहू व भाजीपाल्याची लागवड केली. त्यांनी पशुसंवर्धनचेही काम सुरू केले आहे. यामुळे त्यांना चांगली कमाई होत आहे. त्यांच्याकडे सध्या ५० पेक्षा जास्त गाई आहेत.

ज्याद्वारे ते दूध आणि तुपाचे उत्पादन करतात. त्याचे स्थानिक पातळीवर आणि पंजाबच्या बाहेरही अनेक ग्राहक आहेत. सध्या त्यांच्यायेथे कापूस लागवड करणारे शेतकरी खुप कमी राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी स्वताच्याच कापसापासून कापड बनविण्यास सुरूवात केली.

आता शेतीसोबत ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडेही तयार करतात. सुरेंदर ते कपडे बाजारात विकतात. सुरेंद्र म्हणाले की, सुरूवातीला मी फक्त कापूस विकत होते पण आता मी कपडेही विकतो. त्यामुळे त्यातून मला दुप्पट उत्पन्न मिळत आहे.

पुढे ते स्वता मशीन्स बनविण्याची कल्पना आखत आहेत. त्यांना अधिक अधिक कपडे बाजारात पाठवायचे आहेत. अशा प्रकारे आज ते बक्कळ पैसा कमवत आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.