डिजीटल मार्केटिंग सोडून धरली वेगळी वाट, एका वर्षात मधुमक्षिका पालनातून कमावले २० लाख

0

अनेक लोक आजकाल शेती करत आहेत. पण सगळ्यांनाच यामध्ये नफा मिळत नाही. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी शेतीसारखा नफा देणारा व्यवसाय सोडून आपल्या जमिनी विकल्या आहेत. पण जर आपण योग्य तंत्रज्ञान वापरून शेती केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल.

शेती आजही अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. अशाच एका युवकाने मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये मधुमक्षिका पालनाचा निर्णय घेतला होता. या व्यवसायातून त्यांनी लाखो रूपये कमावले आहेत. नरेश जांग असे त्या तरूणाचे नाव आहे आणि ते हरियाणातील रहिवासी आहेत.

नरेश याआधी डिजीटल मार्केटिंगचा व्यवसाय करायचे. पण आता मधुमक्षिका पालनातून त्यांनी एका वर्षातच २० लाखांपेक्षा जास्त नफा मिळवला आहे. ते शेतीमध्ये येण्याच्या आधी डिजीटल मार्केटिंगमध्ये काम करत होते. नरेश यांनी मधुमक्षिका पालनासोबत मधाचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरूवात केली.

त्यासाठी त्यांनी एक स्टार्टअप सुरू केले आणि नंतर एका कंपनीची नोंदणीसुद्धा त्यांनी केली. त्यांना आधीपासूनच डिजीटल मार्केटिंगचा अनुभव होता त्यामुळे त्यांना कंपनीच्या उत्पादनांची विक्री करताना जास्त त्रास झाला नाही उलट त्याचा त्यांना फायदा झाला.

वर्षभरातच त्यांच्या कंपनीची उलाढाल २० लाखांवर पोहोचली आहे. सध्या नरेश यांच्या कंपनीतून ६ फ्लेवरच्या मधाची निर्मिती केली जात आहे. ३ ते ४ महिन्यात ७ क्विंटल मधाची निर्मिती झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पुर्वनोंदणी पद्धतीने ते ऑर्डर स्विकारतात.

नरेश यांच्याकडे १७० मधपेट्या आहेत आणि त्यातल्या प्रत्येक पेटीतून १५ किलो मध त्यांना मिळतो. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मधनिर्मितीमध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये येतो. २०१९-२० मध्ये भारतात १ लाख २० हजार टन मधाचीन निर्मिती झाली होती.

अनेक राज्यात मधनिर्मिती कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत आणि पाच राज्यांमध्ये १० हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणार आहेत. राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्डाच्या अहवालानुसार भारतात ९५८० नोंदणीकृत शेतकरी आणि संस्थामध्ये मधुमक्षिका पालन केले जाते.

२०१९-२० मध्ये भारताने मध निर्यातीतून ६३३.८२ कोटी रूपये कमावले आहेत. २००५-०६ च्या तुलनेत भारतात सध्या मधनिर्मिती २४२ टक्क्यांनी वाढली आहे. भारत मध सौदी अरेबिया, अमेरिका, संयुक्त अरब, अमिराती, कतार या देशांना मधाचा पुरवठा करतो.

तर केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही दिवसांपुर्वी मधुक्रांती पोर्टलचे निर्माण करण्यात आले आहे. अनेक शेतकरी यातून बक्कळ पैसे कमवत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.