अनेक बिझनेस केले पण नुकसानच झाले, आता पशुपालन करून कमावतोय १० लाख

0

कोणालाही पशुसंवर्धनात रस असेल तर त्यांच्यासाठी दुग्ध पालन हे एक उत्तम क्षेत्र आहे. या क्षेत्रात तुम्ही बरीच कमाई करू शकता. हे असे एक क्षेत्र आहे ज्यात कधीही तोटा होत नाही. एक मोठा फायदा म्हणजे हा बिझनेस सुरू करण्यासाठी खर्च खूप जास्त नाही. तसेच केंद्र व राज्य पातळीवरही सरकार पशुसंवर्धनासाठी कर्ज व अनुदान देते.

गुजरातमधील बनसकांठा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महेंद्रसिंग यांनी चार वर्षांपूर्वी पशुसंवर्धन सुरू केले. आज त्यातून त्यांना वर्षाकाठी १० लाख रुपये उत्पन्न होत आहे. ३० वर्षीय महेंद्र हे आधी हिऱ्यांचा व्यापार करायचे. ते मुंबईत नोकरी करायचे. त्यांना त्या व्यवसायात खुप तोटा झाला.

नंतर त्यांनी प्लास्टीकचा बिझनेस सुरू केला आणि तेथेही त्यांना नुकसानाचा सामना करावा लागला. यानंतर ते गावी परतले. गावात आल्यानंतर पशुपालनात त्यांची आवड वाढली. त्यांनी निर्णय घेतला की ते आता केवळ पशुसंवर्धन करायचे. आणि २०१६ मध्ये एक गाय विकत घेतली आणि व्यवसाय सुरू केला.

त्यांनी दुधाची विक्री आजूबाजूच्या परिसरात विकण्यास सुरूवात केली. तरी त्यांना फारसा नफा मिळाला नाही. सुरुवातीला तोटा झाला असला तरी महेंद्रसिंगने व्यवसाय सोडला नाही किंवा बदलला नाही. प्रथम त्यांनी या विषयावर माहिती गोळा करण्याचे ठरवले, त्यानंतर काम पुढे आणि मोठ्या पातळीवर न्यायचे असे त्यांनी ठरवले.

यानंतर त्यांनी गायी आणि म्हशींच्या दुधाच्या जातीची माहिती घेतली. काही तज्ञांना भेटून त्यांनी व्यवसाय नव्याने सुरू केला. प्रथम त्यांनी गीर जातीची गाय विकत घेतली आणि तिची चांगली देखभाल व केअरिंग केली. त्याचा फायदा त्यांना झाला आणि त्यांना जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन होऊ लागले. यामुळे त्याचे उत्पन्न वाढले.

काही दिवसांनी त्यांनी जनावरांची संख्या वाढविली आणि स्वत: चे डेअरी फार्म हॅपी डेअरी फार्म सुरू केले. आज त्यांच्याकडे ४५ गायी आहेत. यामध्ये ३० अमेरिकन (जर्सी) गायी, १० बन्नी आणि राजस्थानी म्हशींचा समावेश आहे. दररोज ते ४०० लिटर दुधाचे बाजार करतात. महेंद्र म्हणाले की सुरुवातीला मला या व्यवसायाचा अनुभव नव्हता. यामुळे मला एक वर्षासाठी नुकसान सहन करावे लागले.

गायीची कोणती जाती खरेदी करावी? त्यांची काळजी कशी घ्यावी? त्यांच्या अन्नाची काळजी कशी घ्यावी. मला याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, परंतु हळूहळू मला लोकांच्या संवादातून आणि प्रयत्नांमधून शिकलो आणि दूध विक्री करुन नफा कमवायला लागलो.

महेंद्र म्हणाले की अमेरिकन गाईचे दररोज ३० लीटर दुध निघते. त्याचवेळी म्हशी दररोज १८ लिटर दूध देतात. मी हे दूध थेट दुग्धशाळेत पोहोचवतो. जे दरमहिन्याला मी पोहोचवतो. जरी मी चारही प्राण्यांचा खर्च वजा केला तरी मला दरमहा ८० ते ९० हजार रुपयांचा नफा मिळतो.

ते म्हणतात की पशुसंवर्धन ऐकायला सोपो वाटते परंतु तसे तसे नाही. चांगल्या अन्नाशिवाय जनावरांच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. गोठ्यात दुध काढणारे लोक आहेत पण मी स्वता गोठ्यात उपस्थित असतो. त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी देखील केली जाते जेणेकरून ते निरोगी राहतील. त्यामुळे आज मी खूप पैसे कमावत आहे.

आता बर्‍याच लोकांना मी पशुपालनासाठी मार्गदर्शन करतो. जर तुम्हाला दुग्धशाळेचे काम करायचे असेल तर यासाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्राकडून माहिती मिळू शकेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचीही मदत आहे. आपण नाबार्डकडून २५ टक्क्यापर्यंत अनुदान देखील घेऊ शकता.

आरक्षित प्रवर्गातील लोकांना ३३ टक्के पर्यंत अनुदान देण्याची व्यवस्था केली गेली आहे. यासाठी कमीतकमी प्राण्यांची संख्या २ आणि जास्तीत जास्त १० असावी लागते. आपण वर्मी कंपोस्ट, दुध वितरण, वाहतूक आणि प्रक्रियेसाठी २५ टक्के अनुदान देखील मिळवू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.