आपल्या आईला कष्टात बघून ‘या’ मुलाने बनवली १ तासात २०० पोळ्या बनवणारी मशीन

0

 

आई आपल्या मुलांना कधीच उपाशी बघू शकत नाही. त्यामुळे नेहमीच मुलांना चांगले खायला मिळावे, यासाठी प्रत्येक आई धडपड करताना दिसत असते. असे असताना आईसाठी आपल्याला काही करता येईल का असा विचार करत एका मुलाने १ तासात २०० पोळ्या बनवणारी मशीन बनवली आहे.

कर्नाटकमधील बुकासागरा गावातील बोम्मई एन वास्तू नावाच्या तरुणाने ही मशीन तयार केली आहे. त्याला पोळ्या खूप आवडत असल्याने त्याची आई त्याच्यासाठी रोज पोळ्या बनवायची. आपल्या आईला रोज पोळ्या बनवताना हातांना त्रास होयचा, त्यामुळे त्याने रोटीमेकर बनवले आहे.

बोम्मई हा व्यवसायने एक वेल्डर आहे. एकेदिवशी त्याला वाटले की, आपण एखादी अशी मशीन बनवायला हवी ज्याने आईचे पोळी करतानाचे कष्ट वाचेल. इतकेच काय तर पूर्ण राज्याला आपल्या रोटीमेकरचा उपयोग होईल.

व्यवसायाने बोम्मई वेल्डर असल्याने त्याला मशीन बनवण्यासाठी लागणाऱ्या सामानाला जमा करण्यासाठी जास्त वेळ नाही लागला. मात्र त्याला प्रत्येक गोष्टींवर प्रयोग करून पहावे लागत होते. पूढे मात्र त्याला प्रयोगात यश मिळाले आणि त्याने मशीन बनवले.

तयार केलेल्या या मशीनमध्ये असणाऱ्या दोन प्लेटांमध्ये मळलेली कणिक ठेवायची. पुढे त्यावर लावलेल्या पिनला घुमवायचे. पुढच्या २० सेकंदात पोळी बनून तयार होते. मशीनमध्ये बोम्मई यांनी हलक्या मोटरचा उपयोग केला आहे.

तसेच ही मशीन जास्त खर्चिकही नाही. १० तास मशीन वापरल्यानंतर १ युनिट वीज खर्च होते. तसेच ही मशीन सौरऊर्जेचा वापर करूनही वापरता येते, त्यामुळे मशीन खूप फायद्याची आहे.

मशीन बनवायला खर्च जास्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर या रोटीमेकरचे उत्पादन करण्यात आले, तर ते फायदेशीर ठरेल. तसेच विशेष बाब म्हणजे न थांबता १ तास वापरल्यानंतर १८० पेक्षा जास्त पोळ्या या मशीनमध्ये बनवता येतात.

मी मशीन बनवल्यानंतर माझी आई खूप आनंदी आहे. मशीनच्या वापरामुळे आईला पोळ्या बनवण्यासाठी आता जास्त वेळ लागत नाही आणि पोळ्या बनवण्यासाठीचे कष्टदेखील घ्यावे लागत नाही, असे बोम्मई यांनी म्हटले आहे.

तसेच मला असे वाटते की घरातले असे छोटे छोटे यंत्र आपल्या कामात मोठी मदत करत असतात. मशीनमुळे आपले अवघड असणारे काम ते सोपे होते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या मशीन बनवायला हव्या, असेही बोम्मई यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.