दूधापासून नव्हे तर शेणापासून ‘हा’ भाऊ कमावतोय लाखो रूपये, वाचा कसे…

0

पैसे कमविण्यासाठी अनेक पर्याय उपलद्ध आहेत फक्त माणसाच्या डोक्यात वेगवेगळ्या आयडिया आल्या पाहिजेत. आपल्याकडे जे काही पर्याय असतील ते आपल्याला ओळखते आले पाहिजेत. जर प्रयोग य़शस्वी झाला तर नंतर आपल्याला पैस कमविण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

अशाच एका व्यक्तीबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. छत्तीसगडमधील गोपालक सध्या दर महिन्याला लाखो रूपये कमवत आहेत आणि तेही शेणातून. पण शेणातून पैसै कसे कमवायचे? हे तुम्हाला विचित्र वाटेल पण हे खरे आहे.

दुधाची विक्री करून दर महिन्याला एक लाख रूपये कमवणे के खुप अवघड काम आहे. परंतु रायपूर येथील सुरजितसिंग शेणातून दर महिन्याला १ लाख रूपये कमवतात. छत्तीसगड सरकारने गोधन न्याय योजना सुरू केली होती.

या योजनेअंतर्गत राज्य सरकार गोबर खरेदी करते. प्रतिकिलो शेणाला सरकार २ रूपये देते. सुरजित दररोज दोन टन शेण विकतो. २ टन शेण म्हणजे २००० किलो शेण. त्यामुळे त्याला दररोजचे उत्पन्न ४००० रूपये मिळते.

असे सगळे मिळून ते महिन्याला सुमारे १.२० लाख रूपये कमावतात. तसेच त्यांच्या दुध देणाऱ्या गाई आहेत. त्यातूनही त्यांना उत्पन्न येते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. गोर्धन न्याय योजनेतून सुरजितसारख्या अनेक गोरक्षकांचा फायदा झाला आहे.

आता पंजाब आणि हरियाणामध्ये अशा योजना सुरू कराव्यात अशी मागणी केली जात आहे. तर विकत घेतलेल्या शेणाचे सरकार काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. या शेणातून वर्मी कंपोस्ट खत आणि इतर उत्पादने तयार केली जातात. यामुळे सेंद्रिय शेतील चालना मिळते.

ही योजना ग्रामीण व शहरी भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाठविण्यात यशस्वी ठरली आहे. या योजनेचा लाभ घेऊन अनेक शेतकरी पैसे कमवत आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.