१.५ लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून या माणसाने समुद्रात बनवले आहे स्वत:चे बेट

0

आजकालचे कलाकार काय करतील काहीही सागंता येत नाही. तुम्ही अनेक कलाकार पाहिले असतील जे विचित्र पराक्रम करण्यात खुप पटाईत असतात. त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक करामती कलाकार आहेत जे प्रसिद्धीसाठी काहीही करतात. पण त्यातल्या त्यात काही कलाकार असेही जे आपल्या कलेने अनेकांना प्रभावित करतात.

भारतात तर अनेक कलाकार आहेतच पण अनेक देशांमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कलेने पुर्ण जगातील लोकांना प्रभावित केले आहे. यूकेमध्ये जन्मलेला कलाकार ऋषी सोआ यांनी समुद्रात एक अनोखे बेट तयार केला आहे. मेक्सिकोच्या किनारपट्टीजवळ मानवनिर्मित बेट बनवण्यासाठी १ लाखांपेक्षा जास्त प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या गेल्या आहेत.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर उभ्या असलेल्या या तरंगणाऱ्या बेटाला जॉयक्सी बेट असे नाव देण्यात आले आहे. या बेटावर एक घर बांधले गेले आहे ज्यामध्ये २ बेडरूममध्ये एक स्वयंपाकघर आणि स्नानगृह आहे. हे घर बनवलेले शौचालय पर्यावरणपुरक आहे ज्यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही.

या बेटावर सोआने दोन तलाव, एक सोलारवर चालणारा धबधबा आणि एक छोटी उपनदी देखील बनविली आहेत. वीज आणि इंटरनेट कनेक्शनसाठी सौर उर्जा देखील वापरली जाते. या फ्लोटिंग बेटाचा पाया जाळ्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या भरून तयार केला गेला आहे.

त्यांनी वारंवार या बाटल्यांची संख्या वाढवून या बेटाला मोठे बनवले आहे. जॉयक्सी बेटाचे बांधकाम २००७ मध्ये सुरू झाले. जॉयक्सी प्रमाणेच येथे आणखी एक बेट होते, ‘स्पायरल आयलँड’, जे २ लाख ५० हजार बाटल्यांनी बनलेले होते. २००५ मध्ये हे बेट चक्रीवादळात नष्ट झाले होते.

ऋषी सोआ मॉडेल जोडी बॉलिनसह या अनोख्या बेटावर राहत आहेत. या दोघांमध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री सुरू झाली होती. ऋषी यांनी जेव्हा बेट बांधण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा मीडियाचे लक्ष त्याकडे गेले. यामुळे बर्‍याच स्वयंसेवकांनी ऋषी यांना बेट तयार करण्यासही मदत केली.

प्लास्टिकच्या बाटल्यांवर बनलेल्या या बेटाबद्दल सामान्य लोक आणि पर्यावरणप्रेमींचे मत वेगवेगळे आहे. काही लोक कचर्‍याच्या बाटल्या गोळा करणे आणि त्यांचे पुनर्चक्रण करणे चांगली गोष्ट असल्याचे म्हणतात, परंतु काही लोकांचा असा विश्वास आहे की एखादा अपघात झाल्यास जॉयक्सीच्या निर्मितीमध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू अटलांटिक समुद्रात पसरू शकतात आणि त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते.

तसं जर आपण विचार केला तर दोन्ही बाजू बरोबर आहेत. हे बरोबरच आहे जोपर्यंत हे बेट सुरक्षित आहे तोपर्यंत या बेटाला काहीच धोका निर्माण होणार नाही. पण जर एखादे वादळ आले किंवा समुद्रात मोठ्या लाटा आल्या तर हे बेट उद्धवस्त होऊ शकते. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.