मित्राच्या बहिणीचा कोरोनाने झाला मृत्यु, तेव्हापासून तो गरीबांना मोफत देतोय ऑक्सीजन सिलिंडर

0

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. हजारो लोक सध्या महाराष्ट्रात उपचार घेत आहेत. पण याचदरम्यान वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमावले आहेत. त्यातल्या त्यात ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. पण हे सगळं होत असताना असे बरेच लोक आहेत जे आपल्या जीवाचं राण करून गरीबांना मदत करत आहेत.

त्यातीलच एक नाव आहे शहानवाज शेख. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वताची कारही विकली. सध्या ते गरजूंना ऑक्सीजन सिलींडर पोहोचवत आहेत आणि ते ही मोफत. ते यासाठीसुद्धा प्रयत्न करत आहेत की लोकांना कशा प्रकारे ऑक्सीजन उपलब्ध करून देता येईल.

त्यांच्या याच अभिमानास्पद कामामुळे पुर्ण मुंबईत ते ऑक्सीजन मॅन म्हणून फेमस झाले आहेत. सध्या कोरोनामुळे सगळेजण घरात बसून खबरदारी घेत आहेत. पण अशा काळातही शाहनवाज खान बाहेर फिरून गरजूंना मदत करत आहेत. पण त्यांच्या आयुष्यातही असा प्रसंग आला होता ज्यातून त्यांना ही प्रेरणा मिळाली.

मागील वर्षी कोरोनाच्या काळात त्यांच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. पण वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्याने तिचा मृत्यु झाला होता. रिक्षामध्येच तिचा मृत्यु झाला होता. या गोष्टीचा त्यांना खुप धक्का बसला होता तेव्हा त्यांनी लोकांचा जीव वाचवण्याचे काम करण्याचे ठरवले.

त्यासाठी त्यांनी जमेल तेवढ्या लोकांना ऑक्सीजन सिलिंडर पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना पैसै हवे होते पण त्यांच्याकडे पैसै नव्हते मग त्यांनी स्वताची गाडी विकली. त्यांनी स्वताची फोर्ड एंडेव्हर कार विकून टाकली आणि ६० ऑक्सीजन सिलींडर विकत घेतले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कामाचा अनेकांना फायदा झाला. त्यांना पहिल्या लाटेमध्ये जवळपास ४ हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलींडर देऊन मदत केली होती. दरम्यान, यावर्षीची कोरोनाची लाट मागील वर्षीपेक्षा महाभंयकर आहे. ही परिस्थिती पाहता शहानवाज यांनी मदतीसाठी पुढे येत मालाड येथे वॉर रूम तयार केली आहे.

या ठिकाणी त्यांना मदतीसाठी दररोज जवळपास ५०० कॉल येत असतात. जमेल त्या पद्धतीने ते लोकांना मदत करत असतात. ऑक्सिजन सिलिंडर, बेड्स, व्हेंटीलेटर या सर्व गोष्टींची मदत ते लोकांना करत असतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.