आंबे महाग झाले म्हणून घराच्या छतावरच केली ४० पेक्षा जास्त प्रजातींच्या आंब्यांची शेती

0

तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील जसे की बादलीत फुले, वनस्पती उगवणे किंवा घराच्या छतावर फळभाज्यांची शेती करणे. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की घराच्या छतावर आंब्याची शेती केली आणि तेही ४० प्रकारच्या आंब्यांची.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. एर्णाकुलममध्ये राहणाऱ्या ६३ वर्षीय जोसेफ फ्रांसिस यांनी हा कारनामा केला आहे. ते एअर कंडिशनरचे टेक्निशियन आहेत पण त्यांचे वयस्कर वडिल शेती करतात.

त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांनी १८०० वर्ग फुटावर वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची लागवड केली आहे. काही अशा प्रजाती आहेत ज्यांचे वर्षाला दोनवेळा उत्पादन मिळत आहे. त्यांनी देशातील कानाकोपऱ्यातून आणून गुलाब लावले आहेत.

त्यांनी २५० प्रकारचे गुलाबांची लागवड केली आहे. त्यातील कट रोज नावाची प्रजाती फक्त त्यांच्याकडे आहे. नवीन घर घेतल्यानंतर त्यांनी या गुलाबांची आणि मशरूमची लागवड केली होती. त्यांनी सर्वात आधी पॉलिथीनमध्ये आंब्याचे मोठे मोठे रोपटे लावली.

त्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आला की जर पॉलिथीनमध्ये आंब्याचे मोठे मोठे रोपं जगू शकतात तर मग ही रोपं आपण ड्रममध्येसुद्धा लावू शकतो. जोसेफ यांनी पीवीसी ड्रम खरेदी केले. या ड्रम्सला त्यांनी कापले आणि त्यांना स्टॅन्डवर उभे केले.

बॉटमला बिळे पाडली त्यामुळे जास्त झालेले पाणी त्यातून वाहून जाऊ लागले. त्यात लावलेली रोपं आता ५ ते ९ फुटांपर्यंत वाढली आहेत. त्यांच्या या बागेत अल्फोंसो, चंद्राकरन, नीलम, मालगोवा, केसर यांसारखे प्रसिद्ध आंब्यांची झाडे आहेत.

त्यांच्याकडे ४० पेक्षा जास्त प्रजातींचे आंबे आहेत. त्यांनी ग्राफ्टींग टेक्नोलॉजीच्या आधारे एका नवीन प्रकारच्या आंब्याचा शोध लावला आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की ही आंब्यांची प्रजाती सर्वात गोड आहे. त्यांनी या प्रजातीला पेट्रोसिया हे नाव दिले आहे.

या बागेची निगा राखणे खुप अवघड आहे. जोसेफ म्हणाले त्यांना यातून कसलीही कमाई नको आहे. जोसेफ आपली सगळी फळं नातेवाईकांमध्ये वाटून टाकतात. सुट्टीच्या दिवशी लोक त्यांच्या बागेत येतात आणि मोफत फळे तोडून घेऊन जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.