गाडी साफ करण्यासाठी एकाला डस्टर चोरताना पाहिले आणि त्याला सुचली ही भन्नाट आयडिया

0

आजची कहाणी आहे दिल्लीच्या केशव राय याची. त्याने दोन वेळा स्टार्टअप सुरू केले तो फेल झाला. वडिलांकडून पैसै उधार घेतले होते पण तेसुद्धा बुडाले. पण तिसऱ्यावेळी त्याला अशी भन्नाट आयडिया सुचली की ती याआधी कोणालाच सुचली नव्हती.

यावेळी तो यशस्वीही झाला आणि त्याला बक्कळ पैसाही मिळाला. आता तो महिन्याला १० ते १२ लाख रूपये कमावतो. केशव म्हणाला की, असे म्हणतात की लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमचे सॉल्युशन द्या बिझनेस आपोआप उभा राहील.

असेच काम केशवेही केले. जेव्हा त्याने इंजिनीअरींगला ऍडमिशन घेतले तेव्हा त्याचे अभ्यासात मन नव्हते लागत. त्याने मॅकेनिकल इंजिनिअरींगला ऍडमिशन तर घेतले पण त्याला कॉलेजला गेल्यानंतर कळाले की तो जसा विचार करत होता तसे हे फिल्ड नाही.

त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते. त्याच्या डोक्यात बिजनेस करण्याचा विचार येत होता. पण तो घाबरत होता की तो आयुष्यात काही करू शकेल का नाही. पण याच भितीमुळे तो पुढे जाऊ शकला.

त्याने सर्वात आधी एक वेबसाईट बनवली. विद्यार्थ्यांशी संबधित सगळ्या गोष्टी यात असाव्यात आणि नोट्स व लेक्चर यात असावेत असे मला वाटत होते. त्यासाठी मी त्यात १५ हजार रूपये गुंतवले. तसेच काही मित्रांकडून पैसे उधार घेतले.

असा विचार होता जो कोणी ह्या वेबसाईटला भेट देईल त्याच्यापासून शंभर रूपये चार्ज घेईल. पण ही कल्पना फेल गेली. कोणीही मला साथ दिली नाही. त्यानंतर मी एक ऍप बनवले. यात मी वडिलांची मदत घेतली पण यातही मला यश आले नाही.

मी खुप निराश झालो होतो. एकदा मी मेट्रो स्टेशनच्या बाहेर बसलो होतो तेव्हा मी पाहिले की एक माणूस गाडी साफ करण्यासाठी डस्टर शोधत होता. त्याला एका दुचाकीत डस्टर सापडला. त्याने त्याची बाईक साफ केली आणि डस्टर तेथेच सोडून तो निघून गेला.

हे पाहून मला खुप हसायला आले आणि एक कल्पनाही सुचली. माझ्या लक्षात आले की या समस्येमुळे दररोज किती लोक अडचणीत येत असतील. मी अशी बनवण्याचा विचार केला जेणेकरून कारही स्वच्छ राहिला आणि ड्रायव्हरला ती वस्तू बरोबर घेऊन जाण्याची गरज पडणार नाही.

मी ही कल्पना माझ्या आईवडिलांना सांगितली आणि त्यांनाही ही कल्पना आवडली. आम्ही यावर संशोधन केले आणि बाईक ब्लेझर बनवण्याचा विचार केला. असे बाईक कव्हर जे दुचाकी स्वच्छ ठेवेल आणि दुचाहीसह राहील.

बऱ्याच संशोधनानंतर याचा एक नमुना तयार करण्यात आला. हे हॅंडल फिरवून कव्हर बाहेर काढले जाऊ शकते आणि पुन्हा त्याच हॅंन्डलच्या साहाय्याने ते कव्हर आत घालता येते. पुर्वी या कव्हरमध्ये पेट्रोलच्या टाकीचा आणि बाईकच्या सीट कव्हरचा समावेश होता.

पण आता त्यांनी जे कव्हर बनवले आहे ते पुर्ण गाडीला झाकते. त्यांना पुढे खुप प्रसिद्धी मिळाली. यानंतर सोशल मिडीयाद्वारे आमच्या प्रॉडक्टबद्दल लोकांना माहिती मिळाली. अनेकांनी आमचे कव्हर खरेदी केले. २०१८ मध्ये आम्ही एक कंपनी स्थापन केली.

आता दिल्ली आणि गाझियाबादमध्येही आमची शाखा आहे. आमची वार्षिक उलाढाल एक कोटींपेक्षा जास्त आहे. आता आम्ही नवीन कव्हर विकसित करणार आहोत जे गाडीला कव्हर करेल आणि गाडीला काही इजा होऊ देणार नाही, अशी माहिती केशव राय याने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.