मानलं भावा! शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक, वाचा त्याचा संघर्षमयी प्रवास

0

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने रात्रंदिवस मेहनत करून आकाशाला गवसणी घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा.

राजूचा मोठा भाऊ रोजंदारीवर कामाला जातो. मात्र छोटा भाऊ खुप हुशार होता. त्याची असलेली जिद्द पाहून कुटुबांने त्याला शिकवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. लहान भावाने सुरूवातीला पोलीस हवालदाराची नोकरी सांभाळली.

ती नोकरी सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या एमपीएससी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी त्याने १८ तास अभ्यास केला. त्याची मेहनत फळाला आली. त्याचा राज्यात १०२ वा क्रमांक आला.

त्याचे गावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजू भास्कर यांनी खुप हालाकीच्या परिस्थितीत हे यश संपादन केले आहे. अजूनही त्याचा परिवार दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. त्यांना ही खोली घरकुलात मिळाली होती.

त्याने मोठ्या जिद्दीने अभ्यासाला सुरूवात केली. आपल्या मुलातील गुणवत्ता ओळखून कुटुंबाने मजुरी आणि शेळीपालन करून त्यांना शिकवले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले.

उच्च माध्यमिक व महाविद्यालयात त्याचा इंग्रजी विषय़ात पहिला नंबर आला होता. परिस्थितीवर मात करून त्याने पोलिस दलात नोकरी मिळवली. पोलिस हवालदार म्हणून पुणे पोलिस दलात निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण काळातही प्रथम क्रमांक पटकावला.

पण त्यांना अधिकारी पदावर जायचे होते त्यासाठी त्यांनी सतत मेहनत घेतली. २०१६ साली त्यांनी एमपीएससीची परिक्षा दिली पण अवघ्या दोन मार्कांनी त्यांची पोस्ट गेली. त्यांना खुप दुख झाले होते. पण ते खचले नाहीत आणि २०१७ मध्ये पुन्हा एमपीएससीची जाहिरात निघाली.

त्यांनी या परिक्षेत यश मिळवले. अभ्यासाठी त्यांनी स्वताला कोंडून घेतलं होतं. या परिक्षेत २३३ पदांवर राज्यात त्यांनी १०२ वा क्रमांक मिळवला. आपल्या मुलाचे यश पाहून आणि ते यश मिळवण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ते पाहून त्यांच्या आई, वडिल, पत्नी, भाऊ, बहिण व इतर नातेवाईकांना आंनदाश्रू अनावर झाले.

गावातील पहिला कलेक्टर म्हणून पुर्ण गावाने त्यांचा सत्कार केला. एवढंच काय चिंचवड पोलिस ठाणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या जिद्दीला सलाम आणि त्यांनी हे यशाचे शिखर गाठून अनेकांना प्रेरणा दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.