मॅडम म्हणाल्या आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी, तेथून त्याने ठरवलं आपण कलेक्टर व्हायचं

0

एका मुलाने मॅडमला विचारले की कॅलेंडरमध्ये लाल रंग असला तर शाळेला सुट्टी असते. पण मॅडम आज तर कॅलेडंरमध्ये लाल रंग नाही तरी शाळेला सुट्टी का? नवोद्य विद्यालयाच्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रश्नावर मॅडमने उत्तर दिले अरे आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे ना.

तेथून त्या मुलाने ठरवले ती आपण कलेक्टरच व्हायचे. नारवाटी गावातील नवोद्याचा विद्यार्थी असलेल्या संतोष सुखदेवे यांनी केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगिल जिल्ह्याचा उपायुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला.

त्यांची कहाणी खुप प्रेरणादायी आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात एक गाव आहे त्याचे नाव आहे नारवाटी. गावात जेमतेम साडेचारशे वस्त्या असतील. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा.

त्याच गावातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाच्या आईचे स्वप्न होते की आपला मुलगा सरकारी नोकरीत लागावा. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संतोषचा नवोदयला नंबर लागला.

तेथून त्याचे आयुष्य बदलले आणि नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण घेतल्यानंतर बार्टी दिल्ली येथे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून २०१७ च्या बॅचमध्ये त्याने कलेक्टरची परिक्षा पास केली.

वडिल गरीब शेतकरी होते त्यामुळे घरची परिस्थिती हालाखीची होती. पुण्यात शिक्षण घेताना पैसै कमी पडत होते. मग विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेअंतर्गत मेहनत करून शिक्षण घेतले.

कधी कधी तर दोन तीन पार्ले बिस्कीटाच्या पुड्यावर दिवस काढले आणि अभ्यास केला. दिवसातील १३ ते १४ तास अभ्यास करून संतोष यांनी पहिल्याच प्रयत्नात कलेक्टर होण्याचा मान मिळवला आहे. सध्या पुर्ण देशातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.