तिरंग्यामध्ये ‘हा’ बदल केल्यामुळे गांधीजी झाले होते दु:खी, कोणीही त्यांचे ऐकले नाही, वाचा पुर्ण किस्सा

0

२२ जुलै १९४७ रोजी जेव्हा संविधान सभेने तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला तेव्हा गांधीजी निराश झाले होते. कारण त्या झेंड्यात एक बदल करण्यात आला, जो गांधीजींना नको होता. तो कोणता बदल होता ज्यामुळे गांधीजी दुखी झाले होते? यामुळे त्यांच्या मनात हे विचार येऊ लागले की आता कॉंग्रेसचे नेते त्यांच्यापेक्षा वेगळा विचार करू लागले आहे.

स्वातंत्र्यापूर्वी भारताचा कोणताही राष्ट्रीय ध्वज नव्हता. त्यावेळी ब्रिटीश सरकार भारतात युनियन जॅक फडकावत असे. जरी २३०० वर्षांपूर्वी मौर्य साम्राज्याने जवळजवळ संपूर्ण भारत ताब्यात घेतला होता, परंतु तरीही तेव्हा भारताचा कोणताही राष्ट्रीय ध्वज नव्हता.

१७ व्या शतकात मुघल साम्राज्यानेही जवळपास पुर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यावेळीसुद्धा भारताचा राष्ट्रीय ध्वज नव्हता. स्वातंत्र्य होण्यापूर्वी भारतात ५६२ पेक्षा जास्त राज्ये होती. या सर्व राज्यांतही वेगवेगळे झेंडे होते.

पिंगली वेंकय्या यांचे तिरंगा बनवण्यात मोठे योगदान
भारताचा राष्ट्रध्वज बनवण्यात पिंगली वेंकैया यांचे मोठे योगदान आहे. ते स्वातंत्र्यसैनिक होते. १९१६ ते सन १९२१ पर्यंत पिंगली वेंकय्या यांनी ३० देशांच्या राष्ट्रीय ध्वजांवर सखोल संशोधन केले. १९२१ मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी राष्ट्रध्वजाची त्यांनी बनवलेली रचना सादर केली होती. त्या डिझाईनमध्ये प्रामुख्याने लाल आणि हिरवा रंग होता. ज्यामध्ये लाल रंगाने हिंदूंचे प्रतिनिधित्व केले तर हिरव्या रंगाने मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व केले.

गांधींजींनी त्यात पांढरा रंग आणि चरखा समाविष्ट केला
बाकीच्या समुदायातील लोकांना लक्षात घेता गांधीजींनी त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्याचा सल्ला दिला. महात्मा गांधींनी ध्वजाच्या मध्यभागी चरखा समाविष्ट करण्याचे सांगितले होते. चरखा त्यावेळी इंग्रजांविरूद्ध क्रांतीचे प्रतीक होते. ऑगस्ट १९३१ मध्ये कॉंग्रेसने आपल्या वार्षिक अधिवेशनात तिरंगा ध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला.

या झेंड्यात लालऐवजी केशरी रंगाचा समावेश केला गेला होता. केशरी रंग धैर्य, त्याग आणि बलिदान यांचे प्रतीक मानला जातो. म्हणजेच आता या ध्वजात भगवा, पांढरा आणि हिरवे असे तीन रंग समाविष्ट करण्यात आले होते आणि मध्यभागी एक चरखा दाखवण्यात आला होता.

गांधीजींना कशा प्रकारचा ध्वज हवा होता?
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी जरी राष्ट्रध्वज निश्चित होणार होता तेव्हा चरख्याला पांढऱ्या पट्टीत ठेवावे अशी गांधीजींची इच्छा होती, परंतु अनेक लोकांनी तसेच काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर गांधीजींना धक्का बसला होता की काँग्रेसमधील नेतेही त्याला विरोध करत आहेत.

गांधीजींचा असा विश्वास होता की ३० वर्ष स्वातंत्र्यलढ्यात प्रतीक राहिलेला तिरंगा देशाने स्वीकारला पाहिजे. स्वातंत्र्यलढ्यातल्या प्रत्येक सभा, निदर्शने आणि मिरवणुकीत हा ध्वज आमच्या लढ्याचे प्रतीक असायचा. मग स्वत: गांधीजींनी त्याला प्राधान्य दिले होते.

गांधीजींच्या या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांना आणि काही लोकांना होता आक्षेप
जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कॉंग्रेस आणि इतर अनेक पक्षांनी या तिरंगाच्या मध्यभागी चरखा ठेवल्याबद्दल आक्षेप नोंदविला. काहींनी असेही म्हटले होते की गांधीजींच्या खेळण्याला भारताच्या राष्ट्रध्वजात ठेवण्याचे काय कारण आहे? ध्वजाच्या मध्यभागी शौर्याचे प्रतीक ठेवले पाहिजे.

गांधीजी त्यानंतर झाले होते दुखी
अशा परिस्थितीत, काँग्रेस नेत्यांनीच नंतर ध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्र ठेवण्याचा निर्णय घेतला. अशोक चक्र हे अशोक आणि त्याच्या सैन्याच्या विजयाचे प्रतिक होते. जेव्हा गांधीजींना अनुयायांच्या या निर्णयाबद्दल कळले तेव्हा ते निराश आणि दुखी झाले होते.

अशोकचक्राचा अर्थ
तिरंगाच्या मध्यभागी असलेल्या निळ्या चाकाला अशोकचे धर्म चक्र देखील म्हटले जाते. हे धर्मचक्र सम्राट अशोकच्या भारताच्या अफाट सीमांचे प्रतीक आहे. त्यावेळी संपूर्ण भारत एका शासन व्यवस्थेच्या सुत्रांमध्ये बांधला गेला होता. समस्त पाकिस्तान आणि आजचा बांगलादेशसुद्धा सम्राट अशोकाच्या साम्राज्यामध्ये सामिल होते.

नंतर त्याच्या निळ्या रंगाला भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मागासवर्गीय आणि दलितांच्या ओळखीचे प्रतिक बनवले होते. भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाइन करणार्‍या पिंगली वेंकैया यांना देश विसरला ही खुप दुखद बाब आहे. त्यांचे राष्ट्रीय ध्वज बनवण्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यात महत्वाचे योगदान होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.