वाचा महात्मा गांधींचे ‘हे’ दहा विचार, जे बदलून टाकतील तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन

0

 

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या केली होती. आजचा दिवस देशभरात शहिद दिवस म्हणून ओळखला केला जातो.

महात्मा गांधींनी त्यांच्या विचारांवर अनेक अशक्य वाटणारी कामे शक्य केली. गांधीजींच्या विचारांना आदर्श मानणारे अनेक लोक आज आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आहे, चला तर मग जाणून घेऊया महात्मा गांधींचे १० अनमोल विचार…

१. तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा की, तुमची संपत्ती तुमची नाही, ती जनतेची आहे.

२. सोन्या-चांदीचे तुकडे नाही, तर आरोग्य हिच खरी संपत्ती आहे.

३. तुम्ही मला कैद करु शकतात, पण माझ्या मनाला कैद नाही करु शकत.

४. तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे, तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे.

५. तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्नाहन देतो, त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

६. ईश्वर सत्य आहे, असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे, असे म्हणा.

७. असे जगा जसे उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे आणि शिका असे जसे तुम्हाला कायम जिवंत रहायचे आहे.

८. भिती तुमच्या शरीराचा रोग आहे, तो तुमच्या आत्म्याला मारतो.

९. प्रथम ते तुम्हाला हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील, त्यानंतर तुमचा विजय होईल.

१०. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चुक करण्याचे स्वातंत्र्य नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.