वाचा, नथुराम गोडसे महात्मा गांधींना गोळी घालण्याआधी काय म्हणाला होता…

0

 

 

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली इथल्या बिडला भवनध्ये गांधीजींची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याचे नाव नथुराम गोडसे होते.

गोडसेने महात्मा गांधींना लागोपाठ तीन गोळ्या मारल्या होत्या, त्यामुळे महात्मा गांधींचा जाग्यावरच मृत्यु झाला होता. आज अनेकांना महात्मा गांधींजींच्या हत्याबाबत जाणून घ्यायचे आहे.

नेमकं ३० जानेवारी १९४८ ला काय झाले होते, की नथुराम गोडसेला महात्मा गांधींना गोळी झाडावी लागली होती. जाणून घेऊया त्या दिवशीचा पुर्ण घटनाक्रम…

त्यादिवशीची तारीख होती ३० जानेवारी १९४८ संध्याकाळचे ४ वाजलेले होते. महात्मा गांधींनी त्यादिवशी सरदार पटेल यांना भेटण्यासाठी बोलवले होते. पटेल त्यांच्या मुलीला घेऊन गांधीजींना भेटण्यासाठी वेळेवर पोहचले.

तेव्हा बैठकीत महात्मा गांधींमध्ये आणि पटेलांमध्ये चर्चा सुरु होती. तेव्हा महात्मा गांधींना असे लक्षात आले की, प्रार्थना सभा सुरु होणार आहे. ती रोज ५ वाजता सुरु होत असे. गांधीजींनी वेळ पाहिली तेव्हा सव्वा ५ वाजलेले होते. त्यानंतर गांधीजी लगेच सभेला निघाले.

गांधीजी प्रार्थना सभेत होते, ती सभा झाल्यानंतर ते सरदार पटेलांना यांना भेटणार होते. प्रार्थना सुरु करण्यासाठी मंचावर जाणार होते तितक्यात नथुराम गोडसे त्यांच्यासमोर आला. त्याने महात्मा गांधींसमोर हात जोडले आणि नमस्कार म्हणाला.

तितक्यात महात्मा गांधींच्या बाजूला असलेली मनू गोडसेला म्हणाली, भाऊ, समोरुन बाजूला व्हा बापुंना आधीच उशीर झाला आहे. तेव्हा ५वाजून १७ मिनिटे झालेली होती.

गोडसेने आधी मनूला धक्का दिला आणि लपवलेली पिस्तुल बाहेर काढली. पिस्तुल गांधीजींच्या समोर धरली आणि सलग तीन गोळ्या गांधीजींच्या छातीवर मारल्या. दोन गोळ्या शरीराच्या आरपार झाल्यातर एक गोळी त्याच्या शरिरात अडकून होती. गांधीजी तिथेच खाली पडले आणि त्यांचा मृत्यु झाला.

त्यानंतर गोडसेने स्वता: त्याचा गुन्हा कबूल केला होता. मी ४ वाजून ५० मिनिटांनी बिडला भवनला पोहचलो होतो, त्यानंतर मी लोकांच्या टोळीत शिरलो, त्यामुळे सिक्युरीटीच्या लक्षात नाही आले. मी गर्दीतच स्वता:ला लपवून ठेवले आणि त्यानंतर थेट गांधीजींच्या थेट समोर गेलो होतो

Leave A Reply

Your email address will not be published.