तुम्हाला माहिती आहे का? महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट एका इंग्रजामुळे झाली होती

0

आधुनिक भारताच्या इतिहासात महात्मा गांधींचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्याबरोबरच रवींद्रनाथ टागोर यांचेही तेवढेच योगदान आहे. या सर्व घटनाक्रमात या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्साही तितकाच अविस्मरणीय आहे.

गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांची पहिली मुलाखत १९१५ साली ६ मार्चला शांतिनिकेतन येथे झाली होती. गांधीजी शांतिनिकेतनला सारखे भेट द्यायचे. गांधीजी यांची पहिली शांतिनिकेतन यात्रा १७ फेब्रुवारी १९१५ साली झाली होती पण तेव्हा टागोर येथे नव्हते.

त्यानंतर ६ मार्चला त्यांची भेट झाली होती. दोघेही उपनिषदवाद आणि भांडवलशाहीच्या विरोधात होते. फक्त त्यांचे काम करण्याचे क्षेत्र वेगवेगळे होते. रवींद्रनाथ टागोर एक खूप मोठे साहित्यिक होते.

त्यांच्यामध्ये अनेक मतभेद होते तरीही ते एकमेकांचे खूप मोठे प्रशंसक होते. गांधीजीनी टागोर यांना महात्मा म्हणून संबोधले तर टागोरांनी गांधीजींना गुरुदेव म्हणून संबोधले होते. या दोघांची भेट एका इंग्रजांमुळे झाली होती त्याचे नाव होते चार्ल्स फ्रिर अँड्र्यूज होते.

अँड्र्यूजने गांधीजींची एक आठवड्याची थांबण्याची व्यवस्था शांतिनिकेतन येथे केली होती. गांधीजींचे निकटवर्तीय काका केळकर यांनी या मुलाखतीबाबत सविस्तर सांगितले आहे. सगळ्यांना हे ऐकायचे होते की जेव्हा दोन महान व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा काय काय घडले असेल?

काका केळकर यांनी सांगितलं की, आम्ही बापू सोबत बैठकीला पोहोचलो होतो. रविबाबू त्यावेळी सोफ्यावर बसले होते. त्यांचे उंची, पांढरे चमकणारे केस, लांब दाढी, शानदार कपडे त्यांची शान वाढवत होते.

बापूंचा साधारण धोती कुर्ता आणि त्यांची एक कश्मिरी टोपी असा पेहराव होता. बापू जेव्हा जमिनीवर हाथरलेल्या चटईवर बसले तेव्हा टागोरसुद्धा त्यांच्यासोबत जमिनीवर बसले. या भेटीमध्ये गांधीजींनी शांतिनिकेतनमध्ये काही बदलाव करायला सांगितले.

त्यांचे म्हणणे होते की शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आपले कामही स्वतः करता आले पाहिजे. त्यांचे म्हणणे होते की शांतिनिकेतनमध्ये छोटी छोटी कामे करण्यासाठी नोकर ठेवायची गरज नाही.

यानंतर १० मार्चला १९१५ ला शांतिनिकेतनमध्ये सेल्फ हेल्प मूव्हमेंटची सुरुवात झाली. या दोघांमध्ये अनेक मतभेद होते. त्यांनी एकमेकांना अनेक पत्र लिहिले होते. मतभेद झाल्यानंतर दोघांमधील एकालाही समोरच्याला चुकीचे दाखवणे खूप अवघड होते.

पण त्यांनी कधी एकमेकांना चिडवले नाही. या भेटीनंतर दोघांमध्ये खूप चर्चा झाल्या. गांधीजी ८ वेळा शांतिनिकेतन गेले होते. दोघेही टेलिग्राम आणि पत्राने खूप बोलायचे. त्यांचे पत्रात नेहमी सत्य, स्वतंत्रता, लोकतंत्र, साहस, शिक्षा आणि मानवतेचे भविष्य यांचा उल्लेख असायचा.

ही सगळी पत्र सामान्य माणसाला वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. हे एक उदाहरण आहे की मतभिन्नता असली तरी मैत्री आणि सम्मान कायम राखू शकतो. हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा आणि जर आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.