बालविवाह झाल्यानंतर गर्भवती असताना पतीने घराबाहेर काढले, आज आहेत १५०० मुलांच्या आई

0

जर तुम्ही आजची महागाई बघितली तर प्रत्येक वस्तुचे दर गगणाला भिडलेले आहेत. अशा वेळेत लहान मुलांना सांभाळणे किती कठीण काम आहे हे फक्त एक मध्यमवर्गीय किंवा ज्याच्या खांद्यावर पुर्ण घराची जबाबदारी असते असा माणुसच समजू शकतो.

आई किंवा वडीलच समजू शकतात की लहान मुलांना सांभाळणे किती कठीण काम आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका आईबद्दल सांगणार आहोत जिला १५०० मुले आहेत. तुम्हाला समजलेच असेल की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत.

सिंधूताई सकपाळ हे नाव सगळ्यांना माहीत आहे कारण त्यांचे कार्यच खुप मोठे आहे. अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी त्यांनी एकेकाळी रस्त्यावर भीक मागितली होती. त्यांचा हा प्रवास एका अशा मुलापासून सुरू झाला होता ज्याचे कोणीच नव्हते.

सिंधूताईंना महाराष्ट्राच्या मदर तेरेसासुद्धा म्हणले जाते. सिंधुताई यांचे १० वर्षांच्या कोवळ्या वयात एका २० वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच त्या गर्भवती झाल्या होत्या.

पण त्यांच्या पतीने त्यांना ९ महिन्यांच्या गर्भवती असताना मरण्यासाठी सोडून दिले होते. त्यांच्या पतीने त्यांच्या पोटावर लात मारली होती. त्या बेशुद्ध अवस्थेत एका गोठ्यात पोहोचल्या आणि त्यांना तिथे आपल्या बाळाला जन्म दिला होता.

त्यांना राहायला घर नव्हते म्हणून त्यांनी रेल्वेमध्ये भीक मागून दिवस काढले. एवढंच नाही तर कधी कधी त्यांनी स्मशानभूमीत जाऊन तिथे मिळेल त्या अन्नापासून आपले पोट भरले होते. खुप लहान वयात त्यांचे लग्न झाले होते.

१० वर्षांच्या वयात त्या ३० वर्षांच्या माणसाच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीने त्यांच्यावर खुप अत्याचार केले. नंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना गोठ्यात आपल्या मुलाला जन्म द्यावा लागला.

सिंधूताई यांनी हाताने आपल्या बाळाची नाळ कापली होती. या गोष्टींनी त्यांना खुप दुख झाले होते. त्यांच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. एका महिला सशक्तीकरण कार्यक्रमात पुण्याच्या सिंधूताई सकपाळ यांनी सांगितले की, मला शिक्षणाची खुप आवड होती पण माझ्या आईने मला शिकून दिले नाही.

लहानपणीच माझे लग्न झाले होते. गर्भवती असताना मला माझ्या पतीने घराच्या बाहेर हाकलून दिले. त्यांनी खुप हालपेष्टा सोसल्या आणि नंतर अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त मुलांचे संगोपन केले आहे आणि त्यातील अनेक मुले आज डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर आणि वकील बनले आहेत.

त्यांच्यासाठी ही खुप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.