५० हजारांच्या गुंतवणूकीत कमावले ५ लाख, पाणी कमी असताना केला भन्नाट प्रयोग

0

 

शेती करायची असेल तर चांगल्या जमिनीसोबत मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठाही लागतो. अनेक शेतकरी तर पाणी नसल्यामुळे शेती करत नाही. पण शेतात जर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहिले. तर तुम्ही पाणीच्या कमतरतेवरही शेती करुन लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतात, असे एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्या शेतकऱ्याने पाण्याची कमी असताना शेतात पिकाची लागवड करुन चांगले उत्पन्न घेतले, तसेच त्यामधून साडे पाच लाखांची कमाई केली आहे.

राज्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यत राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव महादेव गोपाल ढवळे असे आहे. गेल्या वर्षी उस्मानाबादमध्ये पाऊस खुप कमी झाला होता. अशात पाणी न्नसल्यामुळे तिथल्या सर्व शेतकऱ्यांवर शेती करण्याची समस्या निर्माण झाली होती.

पाणी कमी असल्याने शेती करण्यासाठी महादेव यांनाही अडचण होती, पण त्यांनी कसलाही विचार केला नाही आणि तरीही शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात असा प्रयोग केला ज्यामुळे त्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न घेतले आहे.

पाणी कमी असल्याने महादेव यांनी कोथींबीरची शेती करण्याचा निर्णय घेतला. कारण कोथिंबीरची शेती करण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही. तसेच कोथींबीरची शेती खुप कमी दिवसात होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या तीन एकरच्या जमिनीत कोथिंबीरची लागवड केली.

कोथिंबीरची लागवड केल्यानंतर त्याने बोरवेलने त्यांना पाणी दिले आणि शेती केली. सर्व गोष्टींसाठी महादेव यांना ४० ते ५० हजार रुपये खर्च आला. जेव्हा कोथिंबीरची पुर्ण वाढ झाली तेव्हा त्यांना चांगलेच उत्पन्न मिळाले होते.

विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी ही कोथिंबीर बाजारात विकली, तेव्हा त्यातून त्यांची साडे पाच लाखांची कमाई झाली. म्हणजेच यातून ५० हजार रुपये खर्च वजा करता त्यांना या शेतीतून पाच लाखांचा फायदा झाला. त्यामुळे फक्त उस्मानाबादमध्येच नाही तर पुर्ण महाराष्ट्रात त्यांचीच चर्चा होत आहे.

राज्यात उस्मानाबाद असा एक जिल्हा आहे जिथे पाऊस खुप कमी पडतो. त्यामुळे तिथले शेतकरी मूंग, सोयाबिन, कापूस या पिकांची शेती करतात. पण या सर्व पिकांची वाढ होण्यासाठी खुप वेळ लागतो, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हे पीक घेऊन नुकसान सुद्धा झाले आहे. पण महादेव यांनी केलेली शेतीमुळे सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.