मधुकर घुसळे यांचं गर्दीनं डोकं फिरलं मग त्यांना सुचलं डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया..

0

प्रसिद्ध गीतकार मधुकर घुसळे यांचे अनेक किस्से आहेत. तुम्ही त्यांचा कारभारी दमानं या गाण्याचा किस्सा ऐकलाच असेल. आज आम्ही तुम्हाला डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया.. या गाण्याचा किस्सा सांगणार आहोत.

ही दोन्ही लोकप्रिय गीते ही घुसळे यांनीच लिहीली आहेत. पण हे जास्त कोणाला माहित नाही. त्यांनी कधीही आपली प्रसिद्धी केली नाही पण त्यांची गाणी मात्र खुप हिट झाली. ते कधीच प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत.

अत्यंत शांत, संयमी स्वभाव असलेले घुसळे यांचा गाण्याचा किस्सा वाचला तर तुम्हालाही हसू येईल. एक वरमाय रूसली या गाण्याचं रेकॉर्डिंग करून गीतकार मानवेल गायकवाड आणि मधुकर घुसळे आपआपल्या घरी निघाले होते.

दोघेही लोकलने प्रवास करत होते. तुम्हाला तर माहितच असेल लोकलला किती गर्दी असते. लोकलमधली गर्दी पाहून मधुकर घुसळे यांचं डोकं फिरलं आणि त्यांना गाणं सुचलं. हे गाणं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खुप लोकप्रिय आहे.

डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलया, हाताला धरलंया, म्हणून ते लगीन ठरलंया…असं ते गाणं होतं. घुसळे यांच्या घरात कोणीही गाण्याच्या क्षेत्रात नव्हते तरीही त्यांनी गाण्याच्या क्षेत्रात वळण्याचा निर्णय घेतला. गाण्याचा आणि त्यांचा लांबलांबपर्यंत संबंध नव्हता.

केवळ गायनाच्या संपर्कात आल्याने त्यांना गाणी लिहीण्याची आवड निर्माण झाली. ते कल्याणच्या वालधुनीमधील अशोक नगरातील रहिवासी होते. घुसळे यांच्या परिसरात बुद्ध जयंतीला, भीम जयंतीला गायनपार्ट्यांचे कार्यक्रम होत असत.

घुसळे लहानपणापासून हे कार्यक्रम आवर्जुन पाहत असायचे. त्यामुळे त्यांच्यावर या गाण्यांचा खुप परिणाम झाला. घुसळेंच्या वडिलांचे कलावंतांसोबत चांगले संबंध होते. ही कलावंत मंडळी घुसळेंच्या घरी दोन तीन महिने राहायला असायचे.

त्यामुळे घरातही गायनाच्या मैफिली रंगायच्या. कलावंतांमध्ये अनेक चर्चा होत असत. जसे गाणं कसं तयार केले जाते? चाल कशी बांधली जाते? गायक स्वर कसा लावतात? या सर्व गोष्टींचे निरिक्षण घुसळे यांनी केले होते. त्यातून त्यांना गीतकार बनण्याची गोडी निर्माण झाली.

जेव्हा ते १५ ते १६ वर्षांचे होते तेव्हाच त्यांनी गाणी लिहायला सूरूवात केली होती. या वयातही त्यांना ऱ्हिदमचा चांगला अंदाज आला होता. सर्वात आधी त्यांनी लिहीलेली गाणी रंजना शिंदे यांनी गायली होती. रंजना शिंदे यांना घुसळे यांनी लिहीलेली काही गाणी आवडली.

गायिका रंजना शिंदे यांचे पती जगदीश शिंदे यांनी गायक जानू जाधव आणि रंजना शिंदे यांच्याकडे घुसळेंच्या गाण्याचा विषय काढला होता. त्यांनी घुसळे यांची गाणी वाचली तेव्हा त्यांना काही गाणी आवडली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ठाण्यातील सर्व दलित त्यांचीच गाणी गात असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.