नाद खुळा! युट्युबवर पाहून घराच्या छतावर केली ‘ही’ शेती, आता करतोय बक्कळ कमाई

0

 

लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे अनेकांनी  स्वता:चा व्यवसाय सुरु केला आहे, तर काही लोकांनी आपल्या गावी परतून शेती करण्यास सुरुवात केली आहे.

आजची हि गोष्ट अशा एका तरुणाची आहे, ज्याने  परदेशातील नोकरी सोडून आपल्या गावी आला आहे आणि तिथे शेती करुन बक्कळ पैसा कमवत आहे. इकेरळमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव एलदोस राहू असे आहे.

एलदोस गेल्या १० वर्षांपासून कतारमध्ये नोकरी करत होता. तिथे त्याला लाख रुपये पगार होता, त्यामुळे तो परदेशातली नोकरी करत होता. पण त्याला कुटुंबापासून दूर राहवले गेले नाही आणि अखेर नोकरीला रामराम ठोकला आणि पुन्हा आपल्या गावी आला.

गावी आल्यानंतर त्याने पुन्हा नोकरी करत बसण्यापेक्षा शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने कमळाची शेती सुरू केली. आता तो कमळाची शेती करून महिन्याला ३५ ते ४० हजार रुपये कमवत आहे.

एलदोसने एर्नाकुलममधून नर्सिंगचे शिक्षण घेतले आणि नोकरी शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला मुंबईला नोकरी मिळाली. तिथे ३ वर्षे त्याने नोकरी केली. नंतर त्याने कतारच्या एका कंपनीला इंटरव्ह्यू दिला होता. त्यामुळे त्या कंपनीने त्याला ऑफर दिली. पगार चांगला असल्याने एलदोसने नोकरी करण्यास होकार दिला आणि त्याने कतारमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.

तिथे त्याला चांगला पगार मिळत होता पण त्याच्या जवळ त्याचे कुटुंब नव्हते. परदेशातून सारखे सारखे कुटुंबाला भेटण्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळे शेवटी २०१९ मध्ये नोकरी सोडली आणि गावी परतला.

घरी आल्यानंतर त्याला वाटले आपल्याला कामाचा अनुभव आहे, त्यामुळे नोकरी लवकर मिळेल, पण तसे झाले नाही. नोकरी शोधत असतानाच देशभरात कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊन पडले.

घरात कमवणारा तो एकटाच होता. त्याला घरी कमळ आणायची आवड होती, तेव्हा त्याला वाटले की आपल्या कमळ ऑनलाइन विकता येईल. तेव्हा त्याने युट्युबवर कमळाच्या शेती संबंधित व्हिडीओ पाहिले आणि कमळाची शेती सुरू केली.

त्याने घराच्या छतावरच कमळाची शेती केली आहे. आता सध्या वेगवेगळ्या देशातील ४० पेक्षा जास्त प्रजातींचे कमळांची लागवड केली आहे. त्याने या कामात ५० हजारांची गुंतवणूक केली होती. त्याने थायलंड, युरोप सारख्या देशातून कमळांची आयात केली.

एलदोसने फेसबुकवर एक पेज बनवले आणि कमळाची विक्री करण्यास सुरुवात केली.काही दिवसांतच त्याला पहिली ऑर्डर मिळाली. त्याला दिल्ली मुंबई, पुणे, अशा वेगवेगळ्या शहरांतून ऑर्डर येण्यास सुरूवात झाली. आता एलदोस महिन्याला ३५ ते ४० रुपये कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.