दोन हजार रुपयांमध्ये घरातच सुरु केली मशरुमची शेती, आता करतोय तगडी कमाई

0

 

 

कोरोनाच्या संकटामुळे अनेक कामगार, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे सर्वांचेच आर्थिक चक्र बिघडले आहे, पण अनेकांनी या संकाटाला संधी म्हणून बघितले आहे. या काळात अनेक तरुण-तरुणींनी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला आहे आणि त्यांनी सुरु केलेल्या व्यवसायातून ते खुप कमी वेळात स्थिर होताना दिसून येत आहे.

आज आम्ही अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने लॉकडाऊनमध्ये घरी रिकामे बसून राहण्यापेक्षा घरातच मशरुमची शेती करुन लाखोंची कमाई केली आहे. नोखामध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव लोकेश आणि सिद्ध असे आहे.

लॉकडाऊन काळात सर्व बंद असल्याने सर्वच जण घरी बसलेले होते. लोकेश सिद्ध पण घरीच बसलेला होता पण रिकामे बसून राहणे त्याला आवडत नव्हते, त्यामुळे त्याने घरीच काहीतरी करण्याचे ठरवले.

कोरोना काळात लोकांचे लक्ष इम्युनिटी पावर वाढवण्याकडे होते. त्यामुळे त्याने घरातच मशरुमची शेती करण्यास सुरुवात केली. कारण मशरुम हे पौष्टीक असल्याने त्याने ही शेती करण्याचा निर्णय घेतला.

मशरुमची लागवड कुठे करणार असा प्रश्न त्याला पडला पण लॉकडाऊन असल्याने त्याने ही शेती घरीच करण्याचा निर्णय घेतला. लोकेश हा कृषी शाखेचा विद्यार्थी आहे, त्याने बीएससी एग्रीकल्चरची पदवी घेतली आहे, आता पुढचे शिक्षण घेत आहे.

घरातील एका खोलीत त्याने लोखंडी रोलला प्लास्टिकची पिशवी बांधूव मशरुमची लागवड करण्यास सुरुवात केली. त्याने सुरुवातीला ४ किलोचे उत्पन्न घेतले आहे. मशरुमची काढणी आधी ३५ दिवसांत येते तर पुढची काढणी ४५ दिवसांमध्ये येते. लोकेशने तीस प्लास्टीकच्या बॅगेत मशरुमची लागवड केली आहे.

तापमान व्यवस्थित ठेवले तर आपण ४-५ वेळा काढणी करु शकतो. मशरुमची एक किलोची लागवड केल्यानंतर त्यातून १० ते १२ किलोचे उत्पन्न घेता येऊ शकते असे, असे लोकेशने म्हटले आहे.

घरच्या घरी मशरुमची शेती करायची असेल, तर साधारणत: दोन हजारांचा खर्च येतो. एकीकडे नोकरी गेल्याने काही लोक हातावर हात धरुन बसले आहे, पण लोकेश घरातच मशरुमच्या शेतीतून तगडी कमाई करत असल्याने तो तरुणांचे लक्ष वेधून घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.