६० वर्षांपुर्वी एका LIC एजंटने सुरू केली ट्रॅक्टरची कंपनी सोनालिका, आज आहे १२० देशांत व्यापार

0

आज आम्ही तुम्हाला लक्ष्मण दास मित्तल यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. आज ते भारतातील १०० श्रीमंत व्यक्तींमधील एक व्यक्ती आहेत. आज त्यांच्याकडे १५ हजार करोडची संपत्ती आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.

लक्ष्मणदास मित्तल हे सोनालिका ट्रॅक्टर्सचे चेअरमन आहेत. त्यांनी १९५५ मध्ये एलआयसी एजंट म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी फिल्ड ऑफिसर म्हणून अनेक राज्यात नोकरी केली. नोकरीबरोबरच त्यांनी शेतीसंबंधित उपकरणे बनवायला सुरूवात केली.

१९९० मध्ये ते रिटायर झाले. १९९४ मध्ये त्यांनी ट्रॅक्टर्सची मॅन्युफॅक्चरींग करण्यास सुरुवात केली. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उद्योग रत्न पुरस्कारसुद्धा आहे.

लक्ष्मणदास मित्तल यांना तीन मुले आहेत. सगळ्यात मोठा मुलगा अमृत हा कंपनीचा व्हॉइस प्रेसिडेंट आहे. तर तिसरा मुलगा दीपक मित्तल हा कंपनीचा एमडी आहे. दुसरा मुलगा न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर आहे.

लक्ष्मणदास मित्तल यांची मुलगी उषा सांगवान एलआईसीची एमडी होती. त्याच कंपनीत याआधी लक्ष्मणदास मित्तल एजंट म्हणून काम करत होते. जगातील १२० देशांत ट्रॅक्टरची निर्यात करणाऱ्या सोनालिका ग्रुपची स्थापना त्यांनी १९६९ मध्ये केली होती.

तेव्हा त्यांनी ही कंपनी कृषी उपकरणे तयार करण्यासाठी बनवली होती पण १९९५ मध्ये त्यांनी ट्रॅक्टर बनवायला सुरूवात केली. आज सोनालिका भारतातील पाचवी सर्वात मोठी ट्रॅक्टर बनवणारी कंपनी बनली आहे.

लक्ष्मणदास मित्तल यांचा आईटीएलचा उत्तर भारतातील राज्यात खुप मोठा बिझनेस आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातील गावात सगळ्यात जास्त शेतकरी सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर्स वापरतात.

कंपनी दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्स बनवते. ५० हॉर्सपावरपेक्षा जास्त हॉर्सपावर असणाऱ्या मशिनींमध्ये सोनालिकाचा खुप मोठा हात आहे. आज त्यांचे वय ९० वर्षांपेक्षा जास्त आहे तरीसुद्धा ते स्वता कंपनीचा पुर्ण कारभार पाहतात.

लक्ष्मणदास मित्तल यांचा पारिवारिक बिझनेस सोनालिका इंप्लिमेंट्ससुद्धा तेच पाहतात. ही कंपनी सीड ड्रील्स आणि गहूचे थ्रेसर बनवते. तर असा होता लक्ष्मणदास मित्तल यांचा प्रेरणादायी प्रवास. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.